‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली. या चित्रपटासोबतच अनुष्का खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या. ‘बाहुबली’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि अनुष्का डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. मात्र या दोघांनीही या चर्चा अफवा असल्याचं म्हणत रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाकारलं. आता अनुष्काच्या लग्नाविषयीची जोरदार चर्चा असून ती एका क्रिकेटरशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हा क्रिकेटर दक्षिणेचा नसून उत्तर भारतातला असल्याचं कळतंय. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे लग्नाचीही तयारी जोरदार सुरु असल्याचं समजतंय. मात्र अद्याप अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा क्रिकेटर नेमका कोण असेल याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात आहेत.

No captain or selector can ignore him Support grows for Shivam Dube's
T20 WC 2024 : ‘कोणताही कर्णधार किंवा निवडकर्ता ‘या’ खेळाडूकडे दुर्लक्ष करू शकत नाही’: आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील

आणखी वाचा : वयाच्या ४० व्या वर्षी अभिनेत्री करतेय दुसऱ्यांदा लग्न; साखरपुड्याचे फोटो व्हायरल 

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी चर्चांना नाकारल्यानंतर प्रभासचं नाव दुसऱ्या अभिनेत्रीशी जोडलं गेलं. आता अनुष्काच्या लग्नाविषयी या चर्चा कितपत खऱ्या आहेत हे तिच स्पष्ट करू शकेल. तिच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, एप्रिल महिन्यात ‘नि:शब्दम’ हा तिचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आर. माधवन मुख्य भूमिका साकारणार आहे.