‘बाहुबली २’ सिनेमानंतर प्रभास आणि अनुष्का पुन्हा कोणत्या सिनेमात एकत्र दिसणार ही उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमात ही हीट जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सिनेमात प्रभास दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. १५० कोटींच्या बजेटमध्ये बनणाऱ्या या सिनेमासाठी सुप्रसिद्ध स्टंट कोरिओग्राफर केनी बेट्स यांची मदत घेण्यात आली आहे.

अखेर शिवगामीच्या व्यक्तिरेखेबद्दल श्रीदेवी बोलली

‘बाहुबली २’ सिनेमाच्या मध्यांतरामध्ये ‘साहो’चा टीझर दाखवण्यात आला होता. त्यातील प्रभासचा लूक हा बाहुबलीपेक्षा पूर्णतः वेगळा होता. पण ज्या पद्धतीने तो टीझरमध्ये बोलतो ते त्याच्या चाहत्यांना फार आवडले होते. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रभास आणि अनुष्का याआधीही एकत्र आले आहेत, पण या दोघांनाही ‘बाहुबली’ या सिनेमाने जगभरात ओळख मिळवून दिली.

…आणि रजनीकांत अमृता फडणवीसांना भेटले

‘साहो’मध्ये ‘देवसेना’ अर्थात अनुष्का शेट्टीच अभिनेत्री म्हणून दिसणार हे आता जवळपास पक्क झालं आहे. या सिनेमातला अनुष्काचा अंदाज मात्र पूर्णपणे वेगळा असणार आहे. तिला वेस्टर्न ग्लॅम लूक देण्यात आला आहे, त्यामुळे अनुष्का फारच मादक दिसेल याची काळजी ‘साहो’ टीमने घेतली आहे. ‘साहो’मधील प्रभासचा लूक जरी समोर आला असला तरी अनुष्काच्या लूकबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे.
सध्या अनुष्का यासाठी बरीच मेहनत घेताना दिसत आहे. त्यामुळे जर तुम्हाला तिचा साहोमधील लूक दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रभास नुकताच एक महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेऊन भारतात परतला आहे आणि त्याने कामाला सुरूवातही केली आहे.