‘हाफ गर्लफ्रेंड’नंतर अभिनेता अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. आगामी ‘मुबारका’ चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारणार असून काका अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. इलियाना डिक्रूझ आणि अथिया शेट्टीचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणी प्रदर्शित झाली असून, त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूरने नुकताच ट्विटरवरून चाहत्यांशी संवाद साधला.
ट्विटरवर चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं अर्जुनने दिली. अर्जुनने आपल्या आवडीनिवडी, चित्रपटातील किस्से मनमोकळेपणाने चाहत्यांना सांगितल्या. बॉलिवूडमधील अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर आवडते कलाकार असून भविष्यात त्यांच्यासोबत काम करायला आवडेल असे त्याने यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा खरा ‘खिलाडी’ असल्याचे अर्जुनने सांगितले.
I have to say @akshaykumar is a true khiladi #AskArjun https://t.co/3QC1dv7NeX
— arjunk26 (@arjunk26) July 9, 2017
I would have to say @AnushkaSharma & @FarOutAkhtar !!! #AskArjun https://t.co/zYBXLQDGD1
— arjunk26 (@arjunk26) July 9, 2017
रिअल लाईफमधील काका अनिल कपूर यांच्यासोबत शूटिंग करतानाचा अनुभव सांगताना अर्जुन म्हणाला की, ‘त्यांच्यासोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याचा मला गर्व आहे. चित्रपटातील पहिल्या गाण्याचे शूटिंग करताना आम्ही पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली.’
I really like @Samanthaprabhu2 & Nayantara #AskArjun https://t.co/79qIQDv7Ul
— arjunk26 (@arjunk26) July 9, 2017
रणबीरचे दहावीचे गुण तुम्हाला माहित आहे का?
दाक्षिणात्य चित्रपटांमधील आवडत्या कलाकारांबद्दल विचारले असता समंथा रुथ प्रभू आणि नयनतारा आवडत्या अभिनेत्री असल्याचे त्याने सांगितले. तसेच ऑक्टोबरमध्ये ‘संदीप और पिंकी फरार’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचेही त्याने सांगितले. यामध्ये परिणीती चोप्रासुद्धा भूमिका साकारणार आहे.