अभिनेता अर्जुन कपूरचे त्याच्या भावंडांसोबतचे नाते जगजाहिर आहे. त्याची छोटी बहिण अंशुला तसेच चुलत भावंडं सोनम, हर्षवर्धन आणि रिहा यांच्यासोबत त्याचे चांगलेच जुळते. अर्जुन आणि सोनम त्यांच्या भावंडांसोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतंच अर्जुनने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत एक फोटो शेअर केला. अर्जुनचा बालपणातील फोटो पाहता आता त्याच्या शरीरयष्टीत बराच बदल झाल्याचे दिसून येते. त्याचा ‘फॅट टू फिट’ प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

वाचा : टॉप ३ अभिनेत्रींनी नाकारला अजय देवगणचा ‘हा’ सिनेमा

अर्जुनने बुधवारी त्याच्या चुलत भावंडांसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत सोनम कपूरही असून, तिच्यात फार काही बदल न झाल्याचे दिसून येते. मात्र, यात अर्जुनला एका झटक्यात ओळखणे कठीण आहे. यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. चष्मा घातलेला काळ्या टीशर्टमधील अंशुलाच्या मागे असलेला मुलगा म्हणजेच अर्जुन. सोनमच्या पुढे उभा असलेला मुलगा कदाचित हर्षवर्धनच असावा असे दिसते. पण, या फोटोतील ते लहान बाळ आहे तरी कोण? या प्रश्नाचे उत्तर फक्त अर्जुनकडेच आहे. हा फोटो अर्जुनने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यास, ‘हे कोण आहेत?’ असे कॅप्शन दिलेय.

वाचा : बेर्डे, सराफ, कोठारे, पिळगावकर यांच्या ‘नेक्स्ट जनरेशन’चा याराना

नुकताच अर्जुनचा ‘मुबारका’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमादरम्यान अनिल कपूरने त्याला एक प्रश्न विचारला होता. सोनम, रिहा आणि हर्षवर्धन यांपैकी तुला कोण आवडतं, असा प्रश्न त्याने केलेला. त्यावर अर्जुन म्हणालेला की, सोनम ही माझी सर्वात आवडती आहे. आम्ही दोघेही एकाच वयाचे आहोत. आम्ही एकाच शाळेत शिकलो. सुरुवातीपासून भाऊ म्हणून मी तिची जास्तच काळजी घेत आलोय. ती सदैव माझ्या आयुष्यात राहिल.

लवकरच ३२ वर्षीय अर्जुन ‘नमस्ते कॅनडा’ या आगामी चित्रपटात परिणीती चोप्रासह दिसणार आहे. अक्षय कुमारच्या ‘नमस्ते लंडन’चा हा सिक्वल असून, विपुल शहा याचे दिग्दर्शन करतोय.