सध्या बिग बॉसच्या घरातील नवीन कॅप्टन अर्शी खान घरावर अधिराज्य गाजवताना दिसत आहे. शिल्पा शिंदे आणि तिच्यात सध्या शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. आता तर शिल्पाला या शोमधून बाहेर काढण्यासाठीच ती प्रयत्न करत आहे.

सोमवारच्या भागात आकाश ददलानीला ती सांगते की, काहीही झाले तरी यावेळी शिल्पाला घरातून बाहेर काढायचंच आहे. त्यांच्या या संभाषणावेळी पुनीशही तिथे उपस्थित होता. अर्शी आणि आकाशमधील हे संभाषण पुनीशने शिल्पाला जाऊन सांगतिलं.

प्रेक्षकांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या शिल्पाबद्दल केली जाणारी ही कटकारस्थान पाहून बिग बॉसचा माजी स्पर्धक विंदू दारासिंग चिंतेत पडला. त्याने ट्विटरवर आकाश आणि अर्शीच्या षडयंत्राचा विचार करुन मला शिल्पाची काळजी वाटायला लागली आहे. या दोघांनी शिल्पाला बाहेर काढल्यानंतर कदाचित ते सलमान खानलाही या शोमधून बाहेर काढतील, अशीही भिती मला वाटत आहे.

विंदुचे हे मजेशीर ट्विट अनेकांना आवडले. बिग बॉसच्या घरी कोणता स्पर्धक कशाप्रकारे खेळतो हे त्याला पूर्णपणे माहितीये. शिल्पा या शोमध्ये राहावी की नाही याचा निर्णय अर्शी आणि आकाश घेणार नसून जनताच घेणार आहे. सध्या सर्व स्पर्धकांमध्ये शिल्पाच सगळ्यांची चाहती असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शिल्पाला शोमधून बाहेर काढण्याची योजना आखताना स्वतः अर्शीच शोमधून बाहेर गेली नाही म्हणजे मिळवलं. सोमवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कनंतर आता खरी मजा लग्झरी बजेटच्या टास्कवेळी येणार आहे. या टास्कमध्ये कोणती टीम बाजी मारेल हे पाहणे उत्सुकतेचे असेल.