अश्विनी भावेने साजरी केली ‘अशी ही बनवाबनवी’ ची २९ वर्षे!

२३ सप्टेंबर २०१७ रोजी ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण झाली. १९८८ साली २३ सप्टेंबर रोजीच  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि अर्थात प्रेक्षकांनी ‘अशी ही बनवाबनवी’ ला जो काही उदंड प्रतिसाद दिलेला तो आपण आजही ‘ह्याची देही ह्याची डोळा’ पाहत आहोत. अगदी आजच्या पिढीला देखील या चित्रपटाचे संवाद उत्तम पाठ आहेत. विशेष म्हणजे त्यातला लिंबू कलरच्या साडीचा किस्सा तर सर्वांच्याच आवडीचा आहे! अश्विनी भावे आणि अशोक सराफ या दोघांचा तो सीन आजही आपण आवडीने पाहतो.

Karisma Kapoor saved Harish
सीनच्या शूटिंगदरम्यान पाण्यात बुडणाऱ्या अभिनेत्याचा करिश्मा कपूरने वाचवला होता जीव, ३३ वर्षांनी हरीशने केला खुलासा
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

वाचा : Pre-wedding shoot भारती – हर्षचे ‘फन अॅण्ड फ्लर्ट’ शूट

‘अशी ही बनवा बनावीची २९ वर्षे’ हे निमित्त साधून अश्विनी भावेने आपल्या फेसबुक पेजवर चित्रपटातल्या काही सीन्सना एकत्र करून एक व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. . या व्हिडिओला तिने ‘लिंबू कलरची साडी… २९ वर्ष झाली अजूनही रंग फिका पडला नाही’ असे कॅप्शनही दिलेय. अवघ्या एक दिवसात या व्हिडिओला १५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांचं हे प्रेम पाहून अश्विनीला देखील आश्चर्य वाटले. आजही लोक लिंबू कलरची साडी, माधुरी आणि धनंजय माने या पात्रांमध्ये अगदी सहज मिसळून जात आहेत हे पाहून अश्विनीला ही नवल वाटले. विशेष म्हणजे आताची पिढी देखील हा चित्रपट आनंदाने पुन्हा पुन्हा पाहते, याच तिला खास कौतुक वाटले. आजही हा चित्रपट जेवढा मागच्या पिढीचा तेवढाच आजच्या पिढीचा आहे, हे इथे पाहायला मिळतंय.

वाचा : … म्हणून एकता कपूर सनी लिओनीवर नाराज

या आधी काही दिवसांपूर्वी म्हणजेच १९ सप्टेंबर २०१७ रोजी अश्विनीने आपली ऑफिशिअल वेबसाईट लाँच केली होती आणि या उपक्रमालाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.