ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिला आहे, असं ट्विट गायक-संगीतकार अवधूत गुप्तेनं केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून अवधूतने भाजपाला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. दिल्लीकर मतदारांनी आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला.

या निकालानंतर ट्विट करत अवधूत म्हणाला, “असा ऐतिहासिक निकाल देऊन दिल्लीकरांनी जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातील संदेश दिलाय की आम्हाला शाळा, रस्ते आणि महिलांची सुरक्षा हवीये. मंदिरं, मशिदी, पुतळे, कलमं आणि त्यावरुन कुठलाही वाद नकोय! अभिनंदन दिल्लीकर!”

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
Raj Thackeray Padwa melava
“राज ठाकरे ठरवतील तीच धर्माची बाजू असेल”, मनसेच्या वरिष्ठ नेत्याची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…
Former MLA Narayanarao Gavankar withdraws from Akola Lok Sabha constituency
माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांची माघार, अकोला भाजपमधील बंड…
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे

पाच वर्षांनंतर पुन्हा ‘आप’ने अटकेपार झेंडा फडकावल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक मानला जातो. तर निवडणुकीत ५५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपाला केवळ आठच जागा जिंकता आल्या. काँग्रेसला पुन्हा खातेही उघडता आले नाही.