अभिनेता आणि अभिनेत्री यांचे किसिंग सीन यापूर्वी आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिले आहेत. परंतु आता चक्क दोन अभिनेते एकमेकांना किस करताना एका चित्रपटात दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अयुषमान खुराना ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हा चित्रपट दोन पुरुषांच्या प्रेमप्रकरणावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या ट्रेलरमध्ये अयुषमान खुराना अभिनेता जितेंद्र कुमारला किस करताना दिसत आहे. या अनपेक्षित किसिंग सीनमुळे चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Shubh Mangal saavdhan ki safalta ke baad, hum la rahe hain,
Shubh Mangal Zyada Saavdhan
Hum mehnat zyada kar lengey
Aap pyar thoda zyada de dijiyega@aanandlrai @cypplofficial @hiteshkewalya @ErosNow#Valentines2020 #ShubhMangalZyadaSaavdhan #SMZS pic.twitter.com/ubYBiCEirr
— Ayushmann Zyada Khurrana (@ayushmannk) May 9, 2019
काही दिवसांपूर्वी आयुषमानने चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या टीझरवरुनच चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार अशी खात्री प्रेक्षकांना पटली होती. या टीझरवर “शुभ मंगल सावधान या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता आम्ही ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत. आम्ही यावेळी खूप मेहनत केली आहे. तुम्ही देखील थोडे अधिक प्रेम द्या.” अशा आशयाचे ट्विट देखील केले होते.