‘बाहुबली २’ या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेला असून, आता या चित्रपटातील कलाकार त्यांच्या इतर कामांवरही लक्ष देऊ लागले आहेत. प्रभास, अनुष्का शेट्टी आणि आता त्यांच्या मागोमाग राणा डग्गुबतीसुद्धा त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राणाच्या आगामी ‘नेने राजू नेने मंत्री’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या टिझरमध्ये राणा मुख्य भूमिकेत दिसत आहे.

‘बाहुबली’मध्ये जरी राणाच्या रुपातील खलनायक पाहायला मिळाला असला तरीही या आगामी चित्रपटात मात्र तो जनसमुदायाच्या नेत्याची भूमिका साकारणार आहे. ‘नेने राजू नेने मंत्री’ या तेलगू चित्रपटामध्ये त्याची तगडी भूमिका पाहता येणार असल्याचं हा टिझर पाहून लक्षात येतं. अस्सल दाक्षिणात्य अभिनेता काय असतो हे राणाच्या चित्रपटाचा टिझर पाहून लक्षात येत आहे. तेलगू भाषेमध्ये हा टिझर प्रदर्शित करण्यात आला असला तरीही सोशल मीडियावर अनेकांनीच त्याला पसंती दिली आहे. त्यामुळे कलाकाराच्या लोकप्रियतेच्या आड भाषेच्या काहीच सीमा नसतात हेच यातून स्पष्ट होत आहे. पॉलिटीकल थ्रिलर प्रकारात येणाऱ्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल आणि कॅथरिन ट्रेसा या अभिनेत्रीसुद्धा झळकणार आहेत.

https://www.instagram.com/p/BU9jBxRlzhh/

‘मी किती निरर्थक होतो हे तेव्हा मला कळलं’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला राणा डग्गुबती आणि प्रभास या अभिनेत्यांची बरीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात या अभिनेत्यांची बॉलिवूडमध्येही चलती दिसू शकते असं म्हणायला हरकत नाही. तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांची विशेषत: तरुणींची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याला कन्नड चित्रपटांसाठीही विचारण्यात आलं होतं. पण, सध्यातरी त्या चित्रपटांबद्दल राणाने कोणताही निर्णय घेतल्याची माहिती मिळत नाहीये.