‘बाहुबली’ या चित्रपटाच्या निमित्ताने एस.एस. राजामौली यांनी अशी काही पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणली ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. त्यातीलच एक पात्र म्हणजे ‘कटप्पा’. बाहुबली या चित्रपटाच्या पहिल्या भागापासूनच कटप्पा या पात्राविषयी जाणून घेण्यासाठी कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. अभिनेता सत्यराज यांनी साकारलेल्या कटप्पा या भूमिकेला स्वत:चं असं अस्तित्व आहे. या अभिनेत्याच्या चित्रपट कारकिर्दीप्रमाणेच त्यांच्या कुटुंबावरही अनेकांच्या नजरा आहेत.

‘कटप्पा’ म्हणजेच सत्यराज यांची मुलगी सध्या त्यांचं नाव उज्वल करतेय. आपल्या वडिलांप्रमाणेच दिव्यासुद्धा अगदी निडर आणि निर्भीड आहे हेच स्पष्ट होतंय. कारण तिने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच एक पत्र लिहिलंय. काही वैद्यकिय कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी दिव्याने या पत्रातून केलीय. औषधांच्या काही कंपन्यांनी दिव्याला तिच्या रुग्णांना ती औषधं देण्याची विचारणा केली होती. पण, त्या औषधांमध्ये असे काही घटक आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीची दृष्टी जावू शकते इतकच नव्हे तर, त्यांना मृत्यूही ओढावू शकतो याचा अंदाज येताच तिने ही औषधं देण्यास नकार दिला.

katappa

दिव्याने ती औषधं वापरण्यास नकार दिल्यानंतर सदर कंपन्यांकडून तिला धमकीही देण्यात आली. या ठिकाणी जर दुसरं कोण असतं तर त्यांचा चांगलाच थरकाप उडाला असता. पण, दिव्याने न घाबरता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच यासंबंधीची माहिती दिली. मोदींना एका पत्रातून तिने सर्व प्रकारासंबंधी माहिती करुन दिली असून, संबंधित औषध कंपन्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेव्हा आता तिच्या या पत्राची दखल मोदी घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

PHOTO : ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

katappa-2