भारतीय चित्रटपसृष्टीला ‘बाहुबली’सारखा भूतो न भविष्यती अशी कमाई करणारा चित्रपट मिळाला आणि सर्व समीकरणंच बदलली. आजवर कोणत्याही चित्रपटाने केले नसतील असे नवे विक्रम या चित्रपटाने रचले. ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली २ द कनक्लुजन’ Baahubali चित्रपटांनी अभिनेता प्रभासला prabhas प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहचवले. त्याच्या चाहत्यांच्या संख्येत आता कितीतरी पटीने वाढ झाली आहे. केवळ भारतातच नाहीत तर जगभरात आता त्याचे चाहते निर्माण झाले आहेत.

वाचा : दलेर मेहंदी आणि राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करणारा शार्पशूटर गजाआड

गेल्या काही दिवसांपासून प्रभास ‘बाहुबली २’ व्यतिरिक्त त्याच्या आगामी ‘साहो’ चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत होता. मात्र, यावेळेस तो चर्चेत येण्याचे कारण काही वेगळेच आहे. प्रभासच्या आधार कार्डाची प्रत सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्याच्या आधार कार्डची झेरॉक्स कॉपी व्हायरल झाली असून त्यावरील आधार कार्ड नंबर शाई लावून लपवण्यात आल्याचे दिसते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुद्दामून प्रभासच्या आधार कार्डची प्रत सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचे म्हटले जातेय. हे कोणीतरी जाणूनबुजून केल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय. या कार्डावर प्रभासचे ‘उप्पलपती वेंकट सूर्यनारायण प्रभास’ हे संपूर्ण नाव दिसून येते. तूर्तास प्रभासचे हे आधार कार्ड खरे की खोटे याचा उलगडा झालेला नाही. तसेच, प्रभासनेही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वाचा : आर्य अजिंक्य देवचे त्याच्या बाबांना ‘फादर्स डे’ स्पेशल गिफ्ट

मुख्य म्हणजे प्रभासचे आधार कार्ड व्हायरल करण्याचा मुख्य हेतू त्यावर असलेला त्याचा फोटो आहे. कारण, आधार कार्डवरील प्रभासचा फोटो पाहून त्याची खऱ्या लूकशी सध्या तुलना केली जातेय. इतकेच नव्हे तर यावरून त्याची खिल्लीदेखील उडवली जातेय. आधार कार्डसाठी घेतले जाणारे फोटो अगदी साध्या कॅमेऱ्यात घेण्यात आलेले असल्याने ते आपल्याला काळसर दिसतात. त्यामुळे प्रभासच्या फोटोवर मेमेज तयार करून त्याची खिल्ली उडवली जातेय. एका युजरने तर प्रभासला भिकारी म्हणूनही हिणवले आहे.