सेलिब्रिटी आणि मोठ मोठे ब्रॅण्डस् यांच नात फार जवळचं आहे. अनेक बडे सेलिब्रिटी आपल्या नावलौकिकात अधिक भर पाडण्यासाठी तसचं बक्कळ पैसा कमावण्याचं साधन म्हणून मोठ्या ब्रॅण्डस् सोबत हात मिळवणी करतात. बऱ्याच मोठ्या ब्रॅण्डसच्या जाहिरातींमध्ये आपण आजवर अनेक बडे कलाकार पाहिले असतील. तसचं हे कलाकार कायम या ब्रॅण्डचं प्रमोशन करताना दिसतात. मात्र या सगळ्याला बाहुबली फेम प्रभास मात्र अपवाद आहे. उगाच पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी मिळेल त्या जाहिराती करणं किंवा ब्रॅण्डस् सोबत जोडलं जाणं प्रभासला पसंत नाही.
प्रभासने गेल्या वर्षभरात अनेक मोठ्या ब्रॅण्ड एंडोर्समेंटला नकारल्या आहेत. कपड्यापासून इलेक्ट्रॉनिक तसचं एफएमसीजी अशा सर्वच क्षेत्रातील बड्या ब्रॅण्डच्या ऑफर प्रभासला आल्या होत्या. मात्र त्याने त्या नाकारल्या. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभास हा घराघरात पोहचलेला अभिनेता आहे. फक्त देशातच नव्हे तर जगभरात प्रभासची लोकप्रियता आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रॅण्डला प्रभासच्या नावाचा मोठा फायदा होवू शकतो. गेल्या वर्षभरात प्रभासने तब्बल १५० ब्रण्डच्या जाहिरातींसाठी नकार दिलाय.
View this post on Instagram
हे देखील वाचा:‘या’ गोष्टीत अजय देवगण ठरला नंबर वन; सलमान खान आणि साउथ स्टार विजयलाही टाकलं मागे!
सूत्रांच्या माहिती नुसार, प्रभास जाहिरातींच्या आणि ब्रॅण्डच्या बाबतीत निवडक ऑफरवरलाच पसंती देतो. ऑफर नाकारण्या मागचं कारण प्रभासकडे वेळ नाही असं नसून प्रभासला तो सध्या ज्या स्थानावर आहे त्याची पूर्ण जाणीव आहे आणि यासाठी तो पूर्ण विचारपूर्वक निर्णय घेवून जाहिराती आणि ब्रॅण्ड निवडतो. निवडक ब्रॅण्डस् सोबतच तो काम करण्याला पसंती देतो आणि हिच त्याची खासियत आहे.
प्रभास लवकरच त्याच्या ‘राध्ये-श्याम’ या सिनेमातून झळकणार आहे. त्याचसोबत तो ‘सलार’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमातून वेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.