‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन चित्रपटांमुळे दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या आयुष्याला कलाटणीच मिळाली. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या प्रभासचे जगभरात लाखो चाहते आहेत. पण प्रभास एका बॉलिवूड अभिनेत्रीचा चाहता आहे. ती अभिनेत्री म्हणजे रविना टंडन.

नुकत्याच एका मुलाखतीत त्याने त्याच्या आवडत्या कलाकाराविषयी आणि बॉलिवूडच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी सांगितले. ‘मी रविनाचा खूप मोठा चाहता आहे. मी जेव्हा जेव्हा ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील ‘एलो जी सनम’ हे गाणं पाहतो, तेव्हा मी भारावून जातो,’ असं तो म्हणाला.

खरंतर प्रभास रविनाचा जितका चाहता आहे, तितकीच रविनासुद्धा प्रभासची फॅन आहे असं म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी तिने हैदराबादमध्ये ‘बाहुबली’ टीमची भेटही घेतली होती. काही कामानिमित्त रविना हैदराबादला गेली होती आणि तिथे तिची भेट प्रभास, राणा डग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांच्याशी झाली. या सर्व कलाकारांनी मिळून पार्टीसुद्धा केलेली.

VIDEO : पालकांचा ओरडा चुकवण्यासाठी शाहरुखने मुलांना दिला अनोखा पर्याय

प्रभासच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास, त्याचा आगामी ‘साहो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.