डान्सवर आधारित रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून योग गुरु बाबा रामदेव यांना पाहिलं गेलं. त्यानंतर आता ‘ओम शांती ओम’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. रिअॅलिटी शोनंतर रामदेव बाबा बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार असल्याचीही माहिती समोर येतेय.

देशभक्तीपर चित्रपट ‘ये है इंडिया’मध्ये ते भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटातील ‘सैया सैया’ या गाण्यात रामदेव बाबा दिसणार आहेत. या गाण्याला तपेश पवारने संगीतबद्ध केलं असून जावेद अलीने गायलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोम हर्ष करणार आहेत. एका २५ वर्षीय अनिवासी भारतीय तरुणाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. हा तरुण भारताला मागासलेला देश मानत असतो. मात्र काही घटनांनंतर त्याला देशाचं महत्त्व समजू लागतं.

PHOTO : मास्क लावून रिचा पोहोचली ‘फुकरे रिटर्न्स’च्या प्रमोशनला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात गेवी चहल आणि इंडो-ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री डिएना उप्पल यांची भूमिका आहे. राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये याचं चित्रीकरण झालंय. साहजिकच हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असल्याने यामध्ये भूमिका साकारण्यासाठी बाबा रामदेव यांनी लगेच होकार दिला. ‘हा चित्रपट संपूर्ण भारताचं चित्र डोळ्यांसमोर उभं करेल,’ अशी प्रतिक्रिया चित्रपटाच्या शूटिंगनंतर त्यांनी दिली.