राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. प्रभास आणि अनुष्का ही जोडी रुपेरी पडद्यावर जितकी गाजली तितक्याच त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनाही प्रचंड उधाण आले. प्रभाससोबत अनुष्काचे नाते कसे आहे, याबद्दल ठामपणे फार काही सांगता येणे कठीण आहे. पण, प्रभासपूर्वी अनुष्काचा क्रश कोण होता, याचा मात्र नुकताच उलगडा झाला.

चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या सौंदर्याने रसिकांवर भुरळ घालणाऱ्या अनुष्का शेट्टीला एक क्रिकेटर प्रचंड आवडतो. एक चाहती म्हणून ती त्याच्या प्रेमातच पडली होती. अनुष्काने नुकताच एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला. ‘तेलगू स्टफ’ या पोर्टलला मुलाखत देत असताना एका चाहत्याने तिला असा प्रश्न विचारला ज्याचे उत्तर देताना तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य खुलून आले होते.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुला सर्वात जास्त कोणता क्रिकेटपटू आवडतो, असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर देत अनुष्का म्हणाली, ‘राहुल द्रविड माझा सर्वात आवडता क्रिकेटपटू आहे. अगदी माझ्या बालपणापासूनच तो मला फार आवडतो. एका क्षणाला तर मी त्याच्या प्रेमातच पडले होते असे म्हणायला हरकत नाही.’ संयमी खेळीमुळे ओळखल्या जाणारा द्रविड अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. इतकेच नव्हे तर, भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात ऋषभ पंत, संजू सॅमसन या तरूण क्रिकेटपटूंना संधी देण्यातही द्रविडचा मोलाचा वाटा असल्याचे म्हटले जाते.