‘बाहुबली : द बिगनिंग’ चित्रपटातील ‘मनोहारी’ गाण्यात अप्रतिम नृत्य सादर केलेल्या अभिनेत्री स्कार्लेट विल्सनशी एकाने गैरवर्तन केलं. मुंबईत एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. ‘हंसा – एक संजोग’ या चित्रपटात स्कार्लेट एक आयटम साँग करताना दिसणार आहे. याच गाण्याचे शूटिंग सुरु असताना सेटवरील सहकलाकार उमाकांत राय याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. स्कार्लेटने त्याचक्षणी उमाकांतच्या थोबाडीत मारली.

शूटिंगदरम्यान उमाकांत रायने स्कार्लेटवर आक्षेपार्ह टिप्पणीही केली. चित्रपटाचे निर्माते सुरेश शर्मा यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. याशिवाय उमाकांतला चित्रपटातून काढून टाकण्याचाही त्यांनी निर्णय घेतला. या घटनेविषयी सुरेश शर्मा म्हणाले की, ‘उमाकांतने स्कार्लेटसोबत गैरवर्तन केलं. सेटवर अशाप्रकारचं गैरवर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. तूर्तास आम्ही त्याला चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतलाय. त्याने स्कार्लेटची जाहीर माफी मागितली असून आम्ही फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाकडेही त्याची तक्रार करणार आहोत.’

वाचा : दिलीप कुमार यांनी बिल्डरशी चर्चा करून बंगल्याचा वाद सोडवावा- सर्वोच्च न्यायालय 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री स्कार्लेटनं गेल्या वर्षी ‘बिग बॉस’ फेम प्रवेश राणासोबत लग्न केलं. ‘शांघाई’ आणि ‘आर. राजकुमार’ यांसारख्या चित्रपटांत ती आयटम साँगवर थिरकताना दिसली. ‘हंसा- एक संजोग’ या चित्रपटाची कथा तृतीयपंथीयांच्या आयुष्यावर आधारित आहे. समाजाकडून तृतीयपंथीयांना मिळणा-या वागणुकीवर यात भाष्य करण्यात आले आहे.