कलर्स मराठी वाहिनीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेत बऱ्याच घटना, चमत्कार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. येत्या आठवड्यात मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत. बाळूने चंदुलालवर नाराज होऊन त्याचे घर सोडून दिले आहे. कारण, बाळूला देण्यात आलेली ताट चंदुलालची आई बाळूला देण्यास नकार देते आणि त्यामुळेच बाळू तीन दिवस उपाशी राहतो. बाळू आता चंदुलालच्या घरी नसल्याने, आता सगळेच हैराण झाले आहेत. बाळू कुठेच सापडत नाही. बाळूने चंदुलालचे घर सोडल्यानंतर वाटेमध्ये त्याला एक साधू भेटतात आणि त्यांच्याबरोबरच बाळू देवगड येथील प्रसिद्ध देवस्थान कुणकेश्वरच्या शिव मंदिराच्या दिशेने निघतो. या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना कुणकेश्वर येथील आख्यायिका पहायला मिळणार आहे.
देवगड येथील कुणकेश्वर या शिव मंदिरात बाळू एक प्रतिज्ञा देखील घेणार आहे. ही प्रतिज्ञा काय असेल ? हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. तसेच असे देखील म्हटले जाते की ज्या साधू महाराजाच्या मदतीने बाळू तिथवर पोहचला त्यांना तो वचन देतो की दरवर्षी या मंदिरात मी एकदा आंघोळ करायला येईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन.
वाचा : स्वाभिमान! ३० दिवसांत २४ मेमो तरी सयाजींनी केला नाही त्याला नमस्कार
संत बाळूमामा आणि त्यांची आई सुंदरा या दोघांमधील सुंदर आणि अतूट नाते मालिकेमध्ये अत्यंत छानप्रकारे दाखविण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.०० वाजता ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होते.