येत्या जुलै महिन्यात होणाऱ्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अवॉर्ड्स म्हणजेच आयफा २०१७ मध्ये शाहरूख खान दिसणार नाही. शाहरूख पुरस्कार जिंकला नाही किंवा सोहळ्यात परफॉर्म करणार नाही असं कोणतेही कारण यामागे नाही. अशा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणे तो शक्यतो टाळत नाही. खरं तर एसआरके आपला आगामी सिनेमा ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणार आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे शाहरूखचा मोठा मुलगा आर्यनवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे आणि यादरम्यान तो आपल्या मुलासोबत राहणार आहे. यामुळेच २०१७ च्या आयफा पुरस्कार सोहळ्यात आपल्याला शाहरूख दिसणार नाही.

शाळेत फूटबॉल खेळताना आर्यनच्या नाकाचं हाड मोडलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावे लागणार असल्याचे सांगितले. यासाठी एसआरकेसुद्धा परदेशी जाणार आहे. ही शस्त्रक्रिया जुलैमध्येच होणार असल्याने पुरस्कार सोहळ्याला न जाता आपल्या मुलासोबत राहण्याचे शाहरूखने निवडले. अशी माहिती ‘डीएनए’ या वृत्तपत्राने दिली आहे.

वाचा : दिलजीत दोसांजचा पाहा पगडीविना हा नवीन लूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या तीनही मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याला शाहरूख प्राधान्य देतो. आपल्या व्यस्त कामकाजातूनही किंग खान आपल्या मुलांसाठी वेळ काढतो. नुकत्याच झालेल्या करण जोहरच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आर्यन खान दिसला होता. आर्यन सध्या युएसएमधील एका प्रतिष्ठित संस्थेत चित्रपट अभ्यासात पदवी घेत आहे. मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी शिक्षण पूर्ण करण्याबाबत शाहरूख नेहमीच आग्रही राहिला आहे.

वाचा : करिनासोबत रोमान्स करणार ‘हा’ अभिनेता?

किंग खानचा आगामी चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर तो सलमानच्या ‘ट्युबलाइट’मध्ये पाहुणा कलाकाराच्या भूमिकेतही झळकणार आहे.