बॉलिवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगचा आज ३१ वा वाढदिवस. हा वाढदिवस अनेक कारणांसाठी विशेष आहे. रणवीर पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा करणार असल्याची सध्या माहिती समोर येतेय. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी मुंबईतील वांद्रे परिसरात रणवीरला पाहिले गेले. रणवीर या ठिकाणी अनेकदा दिसतो. मात्र यावेळी विशेष कारण असे की त्याला बुधवारी त्याच्या नवीन कारमध्ये पाहिले गेले. त्यावेळी रणवीरसोबत त्याची कथित प्रेयसी अभिनेत्री दीपिका पदुकोणही होती.

रणवीरला गाड्यांची विशेष आवड असल्याने नुकतीच त्याने एक नवीन महागडी कार विकत घेतली आहे. अॅस्टॉन मार्टीन Aston Martin मॉडेलची पांढऱ्या रंगाची कार त्याने विकत घेतली असून ड्राइव्ह करत असताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद सहज दिसून येत होता. १.३५ कोटींपासून सुरू होत ४.५० कोटींपर्यंत या कारची किंमत आहे.

unnamed5

unnamed-14

बुधवारी रणवीर आणि दीपिका हे दोघे कुलाब्यातील ताज हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी गेले आणि तेथून परतताना वांद्रे येथे दोघांना एकत्र कारमध्ये पाहिलं गेलं. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या दोघांनी जरी त्यांच्या नात्याबद्दल कधी खुलेपणाने वाच्यता केली नसली तरी आता हे एक उघड सत्य आहे. हे दोघेही सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचंही म्हटलं जातं. तसेच, दोघांनी हा निर्णय केवळ ‘पद्मावती’ सिनेमासाठी घेतला आहे असे म्हटले जात आहे.

unnamed-24

unnamed-32

वाचा : हॉलिवूडच्या हिरोचे मराठीत पदार्पण

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात ‘पद्मावती’च्या भूमिकेत दीपिका पदुकोण दिसणार असून, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. याशिवाय दीपिकाच्या नवऱ्याची म्हणजेच रवल रतन सिंग या भूमिकेत शाहिद कपूर झळकणार आहे. रणवीर आणि दीपिका तिसऱ्यांदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार आहे. याआधी या दोघांनी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमांत काम केले होते.

Story img Loader