‘भाभीजी घर पे हे’ फेम सौम्या टंडन हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. नुकताचं सौम्यानं आपल्या गोंडस बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नाही तर आपल्या गोंडस बाळाचं नाव काय ठेवावं यासाठी तिनं चाहत्यांकडून मदतही मागितली आहे.

‘आमच्या छोट्या मुलाचं नाव काय ठेवावं या संभ्रमात आम्ही आहोत. त्यामुळे मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही बाळासाठी नाव सुचवा. नाव हे वेगळं आणि लहान असलं पाहिजे त्या नावाचा छान अर्थही असला पाहिजे’ असं सौम्यानं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

न्यायालयीन प्रक्रियेच्या दुरुपयोगासाठी जनहित याचिका नको; याचिकाकर्त्यांना ५० हजार रुपयांचा दंड
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

चाहत्यांनं सुचवलेलं नाव बाळाला ठेवलं तर सौम्या त्या चाहत्याला छानशी भेटवस्तूही देणार आहे. १४ जानेवारीला तिच्या बाळाचा जन्म झाला. नुकतंच तिनं लहान बळाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

‘भाभीजी घर पे हे’ मालिकेत सौम्या अनिता भाभीच्या भूमिकेत होती. २०१६ साली ती सौरभ सिंग सोबत विवाहबंधनात अडकली.