टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात कोणत्या सेलिब्रिटींचा समावेश होणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. काल या शोचा प्रीमियर सोहळा पार पडला. बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान यंदाही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून त्याने शोमधील सेलिब्रिटी स्पर्धकांची ओळख करून दिली. शिवानी दुर्गा, ज्योती कुमारी, सपना चौधरी, जुबैर खान, हिना खान, शिल्पा शिंदे, बेनफाश शोनवाल्ला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी आणि प्रियांका शर्मा हे सेलिब्रिटी स्पर्धक आता बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत.

वाचा : .. म्हणून ‘सैराट’ फेम नागराज मंजुळेने ‘द सायलेंस’ चित्रपटात केले काम

‘भाभीजी जी घरपे है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदे ही सर्वांच्याच परिचयाची आहे. मालिकेतील ‘सही पकडे है’ या तिच्या टॅगलाइनमुळे ती अधिकच प्रसिद्ध झाली. तिच्या याच टॅगलाइनची झलक सलमानलाही पाहावयास मिळाली. ‘कलर्स’च्या ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत सलमान अंगुरी भाभीची ओळख करून देताना ‘सही ना जाऐ ये दूरी, जाने क्या थी मजबुरी, अब हर तमन्ना होगी पूरी, क्योंकी आ गयी है अंगुरी’, असा शेर म्हणताना दिसतो. त्यावर शिल्पा लगेच अंगूरी भाभीच्या अंदाजात ‘सही पकडे है’ असे म्हणते.

वाचा : बॉलिवूडचा ‘राजाबाबू’ पुनरागमनासाठी सज्ज

दरम्यान, ‘बिग बॉस ११’ मध्ये सेलिब्रिटी आणि कॉमन मॅन असे दोन प्रकारचे स्पर्धक असून, त्यांच्यामध्ये रंगणारे टास्क पाहायला मजा येईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे.