टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिकांच्या यादीत ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचा आवर्जून उल्लेख केला जातो. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेनं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं असून या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. अंगुरी भाभी- तिवारी, अनिता- विभूती या जोडप्यांसोबतच हप्पू, सक्सेना, टीका, मालखन आणि टिल्लू या सर्वच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे मानधन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

यामध्ये विभूतीची भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखला मालिकेतील इतर कलाकारांच्या तुलनेत जास्त मानधन मिळते. ‘डेली भास्कर’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार त्याला एका दिवसासाठी तब्बल ७० हजार रुपये इतकं मानधन मिळतं. आसिफने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावर त्याने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

Photos: ‘पानी फाऊंडेशन’साठी सईचं श्रमदान

सौम्या टंडनला एका दिवसाचे ५५ हजार ते ६० हजार रुपये मिळतात तर अंगुरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रेला एका दिवसासाठी ४० हजार रुपये मिळतात. याआधी ही भूमिका शिल्पा शिंदे साकारत होती आणि याच भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र निर्मात्यांसोबत झालेल्या वादामुळे तिने ही मालिका सोडली आणि तिच्या जागी शुभांगी अत्रेला घेण्यात आलं.

शुभांगीपेक्षा अधिक मानधन या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौडला मिळते. रोहिताशला दिवसाचे ५० ते ६० हजार रुपये मिळतात. यासोबतच दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारणाऱ्या योगेश त्रिपाठीला ३५ हजार, अनोखेलाल सक्सेनाची भूमिका साकारणाऱ्या सानंद वर्माला १५ हजार, टिका रामची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वैभव माथुरला २५ हजार आणि भुरे लालची भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदीला २५ हजार इतके मानधन मिळते.