भाभीजी घर पर है मालिकेतील ‘आय लव्ह इट’ म्हणणाऱ्या अनोखे लाला सक्सेना या पात्राला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. अनोखे लाला सक्सेनाची भूमिका साकारणारा अभिनेता सानंद वर्माने त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. खास करून त्याची ‘आय लव्ह इट’ हा डायलॉग म्हणण्याची स्टाइल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सानंद वर्माला या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत सानंदने त्याच्या संघर्षाचा खुलासा केलाय. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सानंदने चांगल्या पगाराची नोकरी सोडली. जेव्हा सानंद अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आला तेव्हा त्याच्याजवळ केवळ शंभर रुपये असल्याचं तो या मुलाखतीत म्हणाला.

हे देखील वाचा: शाहरुख खानच्या लेकीचं नवं टॅलेंट; सुहाना खानचा व्हिडीओ व्हायरल

या मुलाखतीत तो म्हणाला, ” माझ्याकडे केवळ १०० रुपये होते. कुठे जावं, काय करावं हे मला सुचत नव्हत. एका औषध कंपीनजवळ असेल्या एका छोट्याश्या खोलीत मी मुंबईतील माझी पहिली रात्र काढली. त्या खोलीत प्रचंड वास येत होता. ती खोली इतकी लहान होती की मला नीट झोपायला देखील जागा पुरत नव्हती. एका चटईवर मी कशीबशी रात्र काढली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saanand Verma (@saanandverma)

हे देखील वाचा: श्रद्धा कपूरचं चॅट व्हायरल; फोटोग्राफर्सवर चाहते भडकले

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सानंद एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. लाखोंमध्ये त्याची कमाई होती. मात्र त्याने लोन घेऊन एक घर विकत घेतलं होतं. सानंदने अभिनयासाठी नोकरी सोडण्याचा विचार केला. त्यानंतर त्याच्याकडे असलेले सर्व पैसै त्याने घरासाठी दिले. तर हप्ता भरण्यासाठी नंतर पैसै नसल्याने त्याने कारही विकली. सानंदवर एक वेळ अशी आली होती की जेवणासाठी देखील त्याच्याकडे पैस नव्हते असा खुलासा त्याने मुलाखतीत केलाय.

पायी करायचा प्रवास

पैसे नसल्याने सानंद अनेकदा १०-१५ तास पायी चालत प्रवास करायचा. आडिशनसाठी देखील तो अनेक किलोमीटर पायी चालत जायचा.
सानंदने २०१० सालाममध्ये आलेल्या राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यानंतर त्याने ‘रेड’ ,’पटाखा’ आणि ‘छिछोरे’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. तर “भाभीजी घर पर है” ही मालिका सुरु झाल्यापासूनच तो या मालिकेचा एक भाग आहे. या मालिकेतून सानंद आता लाखो रुपये कमावतोय.