टिव्ही स्टॅण्डअप कॉमेडियन भारती सिंगला अचानक पोटात दुखल्यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. २२ जूनला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात तिला रात्री ३ वाजता भरती करण्यात आले. तिला मुतखडा झाल्याचे निदान डॉक्टरांनी दिले. सध्या ती औषधं घेत आहे. तिच्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीने तिचा रुग्णालयातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. पोटाचं दुखणं फार कमी झाल्याचं सांगत चाहत्यांचे आभार मानले.

PHOTOS: मान्यता, संजय दत्तचे व्हेकेशन फोटो पाहिले का?

भारती सध्या नच बलिये ८ मध्ये आपला नियोजित वर हर्ष लिंबाचियासोबत सहभागी झाली होती. त्यांची ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकली नाही आणि हे दोघंही शोमधून बाहेर पडले. पण तरीही नच बलिये ८ च्या अंतिम फेरीत ही जोडी परफॉर्म करणार होती. पण तिच्यावर आता सर्जरी करण्यात येणार असल्यामुळे ती या अंतिम फेरीला मुकली आहे.  काही दिवसांपूर्वीच भारती आणि हर्ष यांनी साखरपुडा केला. इन्स्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याचा फोटो शएअर करून तिने ही माहिती संपूर्ण जगाला दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून भारती आणि हर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघंही यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. आपल्या लग्नाबद्दल सांगताना भारती म्हणाली होती की, इतर मुलींप्रमाणे तिलाही तिच्या लग्नाची स्वप्न पडतात. तिच्या पालकांनाही तिने लवकर लग्न करावे असेच वाटते. खरं सांगायचं तर मला एखाद्या भारतीय गृहिणीप्रमाणे स्वतःला बघायला आवडेल. एक अशी सर्वसामान्य गृहिणी जी आपल्या मुलांसाठी जेवण बनवते आणि एक सर्वसामान्य आयुष्य जगते.

नागिण, माशी झाली आता आणखी एक भपंक हिंदी मालिका तुमच्या भेटीला