भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधील स्टार खेसारी लाल यादव त्याच्या व्हिडीओ आणि चित्रपटांमधील भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतो. एखादा पुरस्कार सोहळा असो किंवा कार्यक्रम असो तो नेहमी भरपूर सोने घालून हजेरी लावतो. खेसारी लाल यादवला उत्तरेकडे गोल्ड मॅन म्हणून देखील ओळखले जात असल्याचे म्हटले जाते. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा एक टिकटॉक व्हिडीओ असून या व्हिडीओत खेसारी लाल यादवची मुलगी वडिल खेसारींबद्दल बोलताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये खेसारी लाल यादवच्या मुलीला मिडिया काही प्रश्न विचारताना दिसत आहे. ‘तुझे वडिल नेहमी खूप गोल्ड परिधान करताना दिसतात. ते हे गोल्ड कुठून आणतात हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे’ असा प्रश्न मीडियाने विचारला होता. त्यावर त्याच्या मुलीने ‘विकत घेऊन येतात’ असे मजेशीर उत्तर दिले आहे. तिचे हे उत्तर ऐकून सर्वांना हसू आल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलीचे हे उत्तर ऐकून खेसारी लाल यादवने लगेच प्रत्युत्तर दिले आहे. खेसारीच्या मुलीचे क्यूट अंदाजातील उत्तर चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. खेसारी लाला यादव नेहमी त्याच्या अभिनयाने तसेच चित्रपटातील गाण्याने अनेकांची मने जिंकतो. खासकरुन खेसारी लाल आणि अभिनेत्री काजल राघवानी यांची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीला उतरते.