‘दम लगा के हैशा’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बाला’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. भूमी लवकरच ‘भूत : एक द हॉन्टेड शिप’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. भूमी तिच्या अभिनयसोबतच फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा भूमी फिट राहण्यासाठी कोणतं डाएट फॉलो करते असा प्रश्न चाहत्यांना पडतो. परंतु भूमी कोणत्याही प्रकारचं डाएट फॉलो न करता एका नियमाचं नियमितपणे पालन करते. त्यामुळे तूप किंवा बटर खाऊन सुद्धा ती फिट आहे. खुद्द भूमीने याविषयी सांगितलं.
“फिटराहण्यासाठी मी कधीही कोणत्या डायटीशियन किंवा न्युट्रिशनिस्टचा सल्ला घेतलेला नाही. मी केवळ एकाच नियमाचं न चूकता पालन करते. तो नियम म्हणजे ‘घरचं जेवण करणं. मी कायम घरी तयार केलेलंच जेवण जेवते. मी खूप खवैय्या आहे, त्यामुळे मला वेगवेगळे पदार्थ खायला कायमच आवडतात. तसंच मला स्वत:च्या हाताने स्वयंपाक करायलाही आवडतो”, असं भूमी म्हणाली.
पुढे ती म्हणते, “मला तूप, बटर हे पदार्थदेखील खूप आवडतात आणि मी ते तितक्याच आवडीने खातेदेखील. मात्र मी प्रक्रिया केलेली साखर कधीच खात नाही. तसंच कार्बोहायड्रेड डाएटदेखील कायम नियंत्रणात ठेवते. तसंच माझी आईच कायम माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देते. त्यामुळे तिच माझी डायटीशियन आहे. त्यामुळे ती कायम मला घरचे पदार्थ खायला घालते ज्यामुळे माझं वजनदेखील नियंत्रणात राहतं”.
वाचा : Video : …अन् कतरिनाने अक्षय कुमारला झाडूने मारलं
दरम्यान, भूमी लवकरच ‘भूत : एक द हॉन्टेड शिप’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटातही झळकणार असल्याची चर्चा आहे.