बिग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणं बिग बींना चांगलंच आवडतं. ७८ वर्ष वय झालं असलं तरी सध्याच्या तरुण पिढीला टक्कर देत बिग बी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या पोस्टही शेअर करत असतात. असं असंल तरी या सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना बिग बींना अनेकदा संघर्ष करावा लागत असल्यातं लक्षात येतं. यामुळे बऱ्याचदा एखादी पोस्ट शेअर करत असताना त्यांच्याकडून चुका होत असतात.
नुकताच बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ शेअर करताना बिग बींचा पुन्हा एकदा गोंधळ उडाला. सध्याचा ट्रेण्ड पककत बिग बिंनी औरोराच्या रनवे अल्बमवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात बिग बींनी त्यांच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘डॉन’ सिनेमातील ‘खैके पान बनारसवाला’ हे गाणं निवडलंय तर बॅकड्रॉपला रनवेचं गाणं जोडलं गेलंय. त्यामुळे हा व्हिडीओ पाहणं खूपच मजेशीर ठरतंय. हा व्हिडीओ शेअर करत बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “किया था क्या , क्या हो गया !!”
View this post on Instagram
हे देखील वाचा: शर्लिन चोप्राने राज कुंद्रासोबतचा ‘तो’ फोटो शेअर केल्याने सोशल मीडियावर खळबळ
बिग बींचा हा धमाल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून बिग बींची लेक श्वेता बच्चन आणि त्यांची नात नव्या नंदा यांना हसू आवरलेलं नाही. दोघींनी कमेंट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसचं बिग बींच्या अनेक चाहत्यांनी देखील या धमाल व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बिग बींनी नुकतच ‘गुड बाय’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलंय. तर लवकरच ‘कौन बनेगा करोडपती’च्या आगामी पर्वात पुन्हा एकदा अमिताभ बच्चन होस्टच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यासोबतच ‘चेहेर’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘झुंड’ या सिनेमांमध्ये ते झळकणार आहेत.