रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने रुळ न ओलांडण्याचा भाग महत्त्वाचा ठरतो. तसंच, रेल्वे परिसरातील स्वच्छतेचाही भाग लक्षात घेउन मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ मोहीम राबवली आहे. रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचं सहाय्य घेतलं आहे. ‘एक सफर रेल के साथ’ या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेच्या सुरक्षा प्रचार मोहिमेत बिग बी सहभागी झाले आहेत. रूळ ओलांडणे जीवावर बेतू शकते, अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते. असे असतानाही पुलाचा किंवा सबवेचा वापर न करता रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याआधीही बरेच मोहीम राबवले गेले.
वाचा : पहिल्यावहिल्या मुलाखतीत जान्हवीने केला श्रीदेवी यांच्यासोबतच्या अखेरच्या क्षणांचा उलगडा
‘एक सफर रेल के साथ’ या मोहिमेअंतर्गत विविध सेलिब्रिटी भारतीय रेल्वेतील प्रवासादरम्यानचा त्यांचा अनुभव एका लघुपटाद्वारे सांगतील. या लघुपटाच्या अखेरीस सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देण्यात येईल.
#Sanjutrailer: तेव्हा आणि आताही संजू म्हणतोय, ‘आय अॅम नॉट अ टेररिस्ट’
अमिताभ बच्चन यांनीसुद्धा मोहिमेसाठी रेकॉर्डिंग केली आहे. यामध्ये ते प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडू नका, पुलाचा वापर करा असा संदेश देत आहेत. या मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शाह, मकरंद अनासपुरे, स्वप्नील जोशी, निशिकांत कामत, सुमीत राघवन, भाउ कदम, सुनील तावडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे आदींनी यांसारख्या मोहिमेत सहभाग घेतला आहे.