‘अंगुरी भाभी’ फेम टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या घरात लग्न तुटल्याचे खरे कारण सांगितले. ४० वर्षीय शिल्पाने जेव्हा लग्न मोडले होते, तेव्हा लोकांनी तिला पळ काढणारी असे हिणवायला सुरूवात केली होती. मनाच्या कोपऱ्यात तिला आजही हे टोमणे फार दुखावतात. झी टीव्हीच्या ‘मायका’ मालिकेमध्ये शिल्पा शिंदे आणि अभिनेता रोमित राजने एकत्र काम केले होते. दोघांनीही २००९ मध्ये लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता. एवढेच काय तर त्यांची लग्नपत्रिकाही छापण्यात आली होती. पण नंतर त्यांच्यातल्या वादामुळे दोघांचे नाते तुटले. त्यानंतर शिल्पाने लग्नाचा विचारही सोडून दिला.

https://www.instagram.com/p/BcEkCq6jJ0-/

‘बिग बॉस’च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये शिल्पा पुनीशला तिचे लग्न मोडल्याचे कारण सांगताना दिसत आहे. शिल्पा त्याला म्हणाली की, सगळे मला पळ काढणारी म्हणायचे. मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शिल्पाने स्वतः हे लग्न मोडले होते. तिचे बोलणे ऐकून आजही तिला हे नाते तुटल्याचे दुःख आहे हे प्रकर्षाने जाणवते.

https://www.instagram.com/p/BcEklAWDR_F/

व्हिडिओमध्ये शिल्पा म्हणते की, ‘लग्न म्हणजे एकमेकांचे रुसवे- फुगवे सहन करायचे. छोट्या गोष्टींपासून सुरू झालेले वाद नंतर आई- बाबा, भाऊ- बहिणींपर्यंत जातात. लग्न म्हणजे फक्त तडजोड.’

https://www.instagram.com/p/BcElDAVDwIE/

रोमित राज, शिल्पाहून तीन वर्षांनी लहान आहे. दोघंही लग्न करणार होते, पण लग्नाच्या काही दिवस आधी शिल्पाने हे नाते तोडले. एका मुलाखतीत शिल्पाने म्हटले होते की, करवा चौथच्या दोन दिवसांनंतर तिला हे जाणवलं की रोमित भविष्यात कोणतीच तडजोड करणार नाही. तो समजून घेणारा नवरा होऊ शकत नाही. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी रोमितने लग्न केले आणि त्याला एक मुलगाही आहे.