‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला आहे. मात्र चार वर्षांची असतानाच अर्शी आपल्या कुटुंबासोबत भारतात आली. अफगाणिस्तानात जन्म झाल्याने आणि अफगाणिस्तानात अनेक नातेवईक असल्याने अर्शीने नुकतीच तिथल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. यानंतर अनेक नेटकऱ्यांनी अर्शी अफगाणिस्तानची नागरिक असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं होतं. यावर अखेर अर्शीने आपलं मौन सोडलं आहे.

अर्शी खानने तिचा जन्म अफगाणिस्तानात झाला असला तरी ती भारताची नागरिक असल्याचा दावा केलाय. तसचं आपण पाकिस्तानी नागरिक असल्याचा अनेकांना गैरसमज झाल्याने कामावर देखील परिणाम झाल्याचा खुलासा तिने केलाय. एका मुलाखतीत अर्शी म्हणाली, “माझ्या नागरिकत्वावर सावाल उपस्थित करत आजवर मला अनेकांनी ट्रोल केलंय. हे खूपच कठीण होतं. अनेकांना मी पाकिस्तानी नागरिक असून भारतात राहत असल्याचा गैरसमज झालाय. याचा माझ्या कामावरीही परिणाम झाला. त्यामुळे मला हे एकदा स्पष्ट करायचंय की मी पूर्णपणे भारतीय आहे. माझ्याकडे भारत सरकारने मान्यता दिलेली सर्व ओळखपत्रं आहेत. मी पाकिस्तानची नसून भारतीय आहे.” असं अर्शी म्हणाली.

हे देखील वाचा: एकीकडे बाळासाठी ब्रेस्ट पंपिंग तर दुसरीकडे मेकअप, आई झाल्यानंतर अभिनेत्री सेटवर करतेय डबल ड्यूटी

पुढे अर्शी म्हणाली, “मी एक अफगाणी पठाण आहे. माझे आजोबा स्थलांतरीत होवून भारतात आले. ते भोपाळमध्ये जेलर होते. माझं मूळ अफगाणिस्तानात असलं तरी मी भारतीय आहे.” असं अर्शी म्हणाली.

हे देखील वाचा: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम, सत्य आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्शी खानने नुकतीच अफगाणिस्तानमधील तिच्या नातेवाईकांबद्दल चिंता व्यक्त केली होती. एका वृत्त वाहिनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी एक अफगाणी पठाण आहे आणि आता हे सगळं पाहिल्यापासून मला खूप भीती वाटते. मला तिथे असलेल्या महिला नागरिकांची काळजी वाटते. माझा जन्म तिथे झाला आहे. जर मी त्यांच्यापैकी एक असते तर मी खूप घाबरले असते. मी खूप दु: खी आहे आणि मी नीट जेवत नाही आहे. माझ्या कुटुंबातील लोक तिथल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत आहेत आणि तुम्ही ही माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा” अशी विनंती अर्शीने केली होती.