बिग बॉस मराठीत एका कार्यात ‘हुकूमशहा’ झालेल्या नंदकिशोर यांनी शर्मिष्ठाला मसाज आणि सई लोकूरला नृत्य करण्यास सांगितल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. महेश मांजरेकर यांनी देखील ट्विटरवरुन या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आज मला लाज वाटतेय’, असे ट्विट करत महेश मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एका कार्यात नंदकिशोर हे हुकूमशाह झाले असून घरातील इतर सदस्य प्रजा आहे. अन्य सदस्यांना नंदकिशोर यांच्या आदेशानुसार वागावे लागणार, असे हे कार्य होते. नंदकिशोर यांनी सई आणि शर्मिष्ठाला सांगितलेले काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
शर्मिष्ठाने मसाज करुन द्यावा, असे आदेश नंदकिशोर यांनी दिले. तर सईला नृत्य करण्याचे आदेश दिले होते. यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. नंदकिशोर यांनी महिलांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. महेश मांजरेकर यांनी देखील ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली. आज मला लाज वाटते, असे ट्विट त्यांनी केले.
महेश मांजरेकर यांच्या ट्विटनंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत नंदकिशोर यांच्या वागण्यावर टीका केली. नंदकिशोर यांनी हे कार्य खालच्या स्तरावर नेले, नंदकिशोर यांनी महिलांचा अपमान केला, नंदकिशोर यांना आवरा, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
https://twitter.com/RashmiBerde/status/1009128483732250625
Kiti khalchya patli var neun thevlay hya nandkishor ne ha task….
Task chya nava Khali ha humilate kartoy Megha team la#BiggBossMarathi
— imfoodholic??❤️ (@imfoodholic) June 19, 2018
https://twitter.com/Dream_2_heal/status/1009127186715107329
दरम्यान, नंदकिशोर हे बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धक म्हणून ओळखले जातात. नंदकिशोर महिलांचा आदर करत नाही, अशी टीका यापूर्वीही त्यांच्यावर झाली होती.