सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. करण जोहरवर होणाऱ्या आरोपांसोबतच शमिता शेट्टी आणि राकेश बापटमधील केमिस्ट्री अधिक चर्चेत आहे. या शोमध्ये दिवसेंदिवस शमिता शेट्टी आणि राकेश बापटमधील जवळीक वाढताना दिसतेय. नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’चा नवा प्रोमो रिलीज झाला असून यात राकेश आणि शमितामधील रोमॅण्टिक क्षण नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत.
या व्हिडीओत शमिता जेवताना दिसतेय. राकेश माइक्रोवेवमध्ये जेवण गरम करतोय. शमिता राकेशला काही सूचना देताना दिसतेय. यावर राकेशने तिला “आणखी काही?” असा सवाल विचारला आहे. राकेशचा हा प्रश्न शमिताला खटकल्याने तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं. तुला काही अडचण आहे का? या शमिताच्या प्रश्नावर राकेशने “तुझ्याकडे बोलण्यासाठी काही आहे का एवढचं विचारत होतो? असं म्हंटलं. दोघांमधील या संभाषणातच शमिता राकेशला म्हणाली ,” इथे ये आणि आधी मला एक किस कर” यावर राकेशने देखील लगेचच शमिताजवळ जात तिच्या गालावर किस केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
शोमध्ये यापूर्वी देखील शमिता शेट्टी आणि राकेश बापटला फ्लर्ट करताना प्रेक्षकांनी पाहिलं आहे. या आधीदेखील राकेशने शमिताला किस केलं आहे. शोमध्ये दोघं बराच वेळ एकमेकांसोबत घालवताना दिसतात. राकेशने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शमितासोबत शेअर केल्या आहेत.