काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा दिल्या होत्या. या शुभेच्छा कशाबद्दल होत्या हे मात्र स्पष्ट केले नव्हते. त्यानंतर नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तिचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. नेहाने तिच्या प्रियकरासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. साखरपुड्याच्या चर्चांवर अखेर नेहाने मौन सोडलं आहे.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, ”मी इतक्यात लग्न करत नाहीये आणि मी साखरपुडासुद्धा केला नाही. किंवा मी बिग बॉसच्या घरातही जात नाहीये. त्या फोटोमधील सर्वजण माझे खास मित्र-मैत्रिणी आहेत. बऱ्याच दिवसांपासून आम्ही काहीतरी प्लॅन करत होतो आणि अखेर ते पूर्ण झालं. म्हणून ती शुभेच्छांची पोस्ट टाकली होती. मी आणि शार्दूल एकमेकांना डेट करत आहोत पण याबाबत मी फार काही आता सांगू इच्छित नाही.”

आणखी वाचा : सेम टू सेम! हुबेहूब अक्षयसारखा दिसणारा ‘हा’ आहे तरी कोण?

नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शार्दूलसोबतचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत. त्यातीलच एका फोटोमध्ये तिच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत असल्याने नेटकऱ्यांनी अंदाज बांधला. या फोटोवर अभिनेत्री श्रुती मराठेनंही ‘ओह माय गॉड’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

Story img Loader