‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर चांगलाच लोकप्रिय आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कायमच या शोमधील वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा रंगत असते. घरातल्या सदस्यांमधील भांडणं, प्रेम, अफेअर याविषयी चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगत असते. यंदाच्या १३ व्या पर्वामध्ये शहनाज आणि सिद्धार्थ यांच्यातील अफेअरची चर्चा रंगली आहे. घरामध्ये बऱ्याच वेळा शहनाज सिद्धार्थसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं. मात्र शहनाज सिद्धार्थसोबत प्रेमाचं खोटं नाटक करत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन ती हे सारं करत होती. आसिम रियाजने घरामध्ये झालेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उलगडा केला.
मुलाखतीमध्ये आसिमने खऱ्या गोष्टीचा उलगडा केल्यानंतर सिद्धार्थसह घरातल्या प्रत्येकालाचा धक्का बसला. मात्र या साऱ्यावर आसिम खोट बोलत असल्याचं स्पष्टीकरण शहनाजने दिलं.
“शहनाज सिद्धार्थसोबत मुद्दाम फ्लर्ट करत असल्याची माहिती मला पारसने दिली होती. मेकअप आर्टिस्ट राजन पासी यांच्या सांगण्यावरुन शहनाज सिद्धार्थवर प्रेम असल्याचं नाटक करते”, असं आसिमने सांगितलं. आसिमच्या या वक्तव्यानंतर शहनाजने तिची बाजू मांडली.
वाचा : सलमानचा बॉडीगार्ड म्हणतो, ‘हा’ ठरणार बिग बॉस १३ चा विजेता
“आसिम जे काही सांगतोय ते सारं खोटं आहे. जर तू कोण्याच्या प्रेमात पडत असशील तर त्या व्यक्तीचा,प्रेमाचा स्वीकार करं, असं माझ्या मेकअप आर्टिस्टने सांगितलं होतं. परंतु त्याने सिद्धार्थ किंवा अन्य कोणाचं ही नाव घेतलं नव्हतं”, असं शहनाजने सांगितलं.
पाहा : छोट्या पडद्यावरील ‘ग्लॅमरस’ सुनबाई!
दरम्यान, ‘बिग बॉस १३’ चा ग्रॅण्ड फिनाले लवकरच संपन्न होणार आहे. त्यामुळे साऱ्यांचंच लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. यंदाच्या पर्वामध्ये सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज आि शहनाज गिल यांच्याकडे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं आहे.