छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोमधील अनेक कलाकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. यामध्ये राहुल वैद्य, जान सानू, निक्की तांबोळी, शहनाज गिल, रुबिना दिलैक, अभिनव हे कलाकार सध्या या ना त्या कारणाने चर्चेत येत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री शहनाज गिल चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर शहनाजचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत या व्हिडीओला जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

‘रसोडे में कौन था?’ या वाक्यावर आधारित गाण्याने मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. ‘साथ निभना साथिया’ या मालिकेतील कोकिलाबेन यांच्या संवादावरील हे गाणं यशराज मुखातेने तयार केलं होतं. विशेष म्हणजे यशराजने आता आणखीन एक गाणं तयार केलं असून हे गाणं ‘बिग बॉस’फेम शहनाज गिलच्या संवादावर आधारित आहे.

‘बिग बॉस’च्या घरात शहनाज काही कारणास्तव दु:खी होती आणि त्याविषयी ती विशाल व आदित्यसोबत चर्चा करत होती. यावेळी बोलत असताना रागाच्या भरात ती, “त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता”, असं म्हणते. तिच्या याच संवादावर यशराज मुखातेने नवीन गाणं तयार केलं आहे.शहनाजचा “त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता” हा डायलॉग ऐकल्यानंतर यशराजने त्याला संगीत देत नवीन गाणं तयार केलं. विशेष म्हणजे शहनाजचा हा संवाद आधीपासूनच फेमस आहे, पण या गाण्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला.

आणखी वाचा- ‘राहुल महाजनने केली आहेत चार लग्न’; गहना वशिष्ठचा दावा

दरम्यान, संगीत निर्माता यशराज मुखातेने या अगोदर स्टार प्लसवरील ‘साथ निभाना साथिया’ च्या डायलॉगवर एक मजेदार रॅप बनविलं होतं.विशेष म्हणजे तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेता वरुण धवन, राजकुमार या दिग्गजांनीही या रॅपचं कौतुक केलं.