‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक मजेशीररित्या एकमेकांशी जुळवून घेत आहेत. या स्पर्धकांमध्ये फावल्या वेळेत गप्पा रंगत आहेत आणि त्यांच्या गप्पांमधून इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. अशाच गप्प्यांदरम्यान विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पा यांनी इंडस्ट्रीमध्ये ते का बदनाम आहेत हे सांगितलं. ‘अनसीन अनदेखा’मधील व्हिडिओत या गप्पा पाहायला मिळाल्या.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वीच बाप्पा यांनी अनेक चित्रपट आणि मालिका साइन केले असतील असं म्हणत शिवानी सुर्वे आणि दिगंबर नाईक यांनी मस्करी करण्यास सुरुवात केली. ‘माझ्याकडे चार तासच आहेत लवकर काय ते करून घ्या असं म्हणत बाप्पा सेटवर येतो. हा किस्सा अनेकजण सांगतात,’ असं शिवानी म्हणाली. यावर विद्याधर जोशींनी उत्तर दिलं. ‘माझ्याबद्दल अशा चर्चा होतात असा अनुभव मलाही आला आहे. आता नाव घेता येणार नाही पण आपल्याच इंडस्ट्रीतील एक निर्माती मला प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी म्हणाली बाप्पा, तू पुरेसा वेळ देत नाहीस असं मी ऐकलंय. माझ्या एका मालिकेच्या निर्मात्यानेही मालिका सुरू होण्यापूर्वी मला हाच प्रश्न विचारला. मी असं काहीच करत नाही. मी ठरलेला वेळ देतो आणि माझं काम प्रामाणिकपणे करतो. उलट, या अशा अफवांमुळे मी उगाच इंडस्ट्रीत बदनाम झालोय,’ असं ते म्हणाले.

Bcci Invites Applications For India Head Coach Position
वय ६०पेक्षा कमी, ३ वर्षांचा कार्यकाळ आणि कठोर अटी, BCCI ने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकासाठी मागवले अर्ज
Sangli, World Nurses Day, World Nurses Day celebration, Honoring Nursing Staff, Dedication of Nursing Staff,
सांगली : परिचारिका दिनानिमित्त सांगलीत परिचारिकांचा सन्मान
Maharashtrachi Hasyajatra than Hastay Na Hasaylach Pahije Good response from the audience to the new program
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
Want to keep a job Then bring the students the directors order to teacher
नोकरी टिकवायचीय? मग विद्यार्थी आणा… संचालकांचा आदेश अन् शिक्षकांची दारोदार भटकंती; पालकांना विविध आमिषे…
Dissatisfaction among students over delay in Maharashtra Public Service Commission exams results interviews
‘एमपीएससी’च्या परीक्षा, निकालांची प्रतीक्षाच; अनेक परीक्षांचे अभ्यासक्रम प्रलंबित, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण

Bigg Boss Marathi 2 : माझ्यामुळे मेघा धाडे पहिल्या सिझनची विजेती ठरली, शिवानी सुर्वेचा दावा

सध्या बिग बॉसच्या घरात सवाल ऐरणीचा हा टास्क रंगतोय. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये काही वादसुद्धा झाले. या आठवड्यात पहिलं एलिमिनीशेनसुद्धा पार पडणार आहे. तेव्हा बिग बॉसच्या घरातून सर्वात आधी कोणाची गच्छंती होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.