‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री रेशम टिपणीस हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहेत. काही दिवसापासून बिग बॉस स्पर्धक राजेश शृंगारपुरे आणि रेशम यांचे सूत जुळल्याचे दिसून येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये रेशमचे अनेक चाहते आहेत. मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. रेशमच्या आयुष्याबद्दलच्या अशाच काही गोष्टी पुढील या पाच मुद्द्यांवरुन समजतात…

१. बिग बॉस स्पर्धक रेशम टिपणीसने या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये येण्यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बाजीगर’, ‘जय हो’, ‘मेरे यार की शादी’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका वठविल्या आहेत. तर काही हिंदी मालिकांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘कॅम्पस’, ‘साहेब बिवी और बॉस’, ‘सतरंगी ससुराल’ या मालिकांमधील रेशमने भूमिका केल्या आहेत. तर ‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षित हिच्या आगामी ‘बकेटलिस्ट’ या चित्रपटामध्ये रेशम झळकणार आहे.

creditors haircuts in bankruptcy cases jump to 73 percent in fy 24
दिवाळखोरी प्रकरणांत बँकांच्या कर्जरकमेला कात्री ७३ टक्क्यांपर्यंत!
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
From May To August Shani Maharaj Walk With Golden Feet In Kundal
सोनपावलांनी शनी ‘या’ राशींच्या कुंडलीला देणार चमक; मे ते ऑगस्टमध्ये धनाने भरेल झोळी, आयुष्यात बदलाचा संकेत
What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?
lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
article about income tax reforms in india
लेख : राजकीय-वित्तीय लोकशाहीच्या मिलाफासाठी..

२. मराठी प्रेक्षकांना आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या रेशम टिपणीसचा जन्म २८ ऑगस्ट १९७३ ला मुंबईमध्ये झाला. तिने आयईएस मॉर्डन इंग्लिश मिडीअम स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.

३. रेशम एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिच्या आवडींपैकी डान्स करणे आणि स्वयंपाक करणे तिला विशेष आवडते. काही दिवसापूर्वीच ‘बिग बॉस’च्या घरात रेशमने ‘पिंगा ग पोरी पिंगा’ या गाण्यावर डान्स करत आपल्यातील कला दाखविली होती. यावेळी स्मिता गोंदकरनेही तिला साथ दिली.

४. रेशम वयाच्या ४५ व्या वर्षीही स्वत: च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते असते. या वयातही ती फिट असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ती तिच्या सौंदर्याबाबत सतर्कही असल्याचे सांगण्यात येते.

५. रेशमने वयाच्या २० व्या वर्षी संजीव सेठ या तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यासह लग्न केले. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. संसार मोडल्यानंतर ती एक सिंगल मदर होऊन मुलगा मानव आणि मुलगी रिशिका यांचा सांभाळ करत आहे. मात्र घटस्फोट घेण्यापूर्वी विचार केला असता तर चांगले झाले असते. अशी कबुलीही तिने ‘बिग बॉस’च्या सेटवर दिली.

रेशम पूर्वी पतीच्या म्हणजेच संजीव सेठच्या संपर्कात असून ते एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे तिने सांगितले. सध्या रेशम आणि राजेशचे सूत जुळल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्ष रेशम घराच्याबाहेर अन्य एका व्यक्तीला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्या व्यक्तीच्या नावाचा अद्याप खुलासा झाला नसून सिंगल मदर असलेली रेशम ‘बिग बॉस’च्या घरात जरी बोल्ड होऊन फिरत असली तरी तिने आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.