बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवनवीन टास्क पार पडत असतात. काल (बुधवार) बिग बॉसने सदस्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं कार्य सोपवलं आणि रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांना ‘टिकीट टू फिनाले’ मिळणार असल्याचं घोषित केलं. या कार्यात आता कोण बाजी मारणार आणि कोणाला फिनालेचं तिकिट मिळणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण ज्याला ते तिकिट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीत पोहोचणार आहे.
बिग बॉसने सदस्यांना आणखी एक महत्त्वपूर्ण कार्य सोपवलं आहे, ते म्हणजे सदस्यांना एकमेकांचं प्रतिनिधित्व करण्याचे. सदस्यांना बाबागाडी देण्यात आली आणि ज्या सदस्याची बाबागाडी पार्क होऊ शकणार नाही तो ‘टिकीट टू फिनाले’मधून बाद होणार. काल आस्तादची बाबागाडी पुष्कर पार्क करण्यात अयशस्वी ठरला. त्यामुळे आस्ताद या रेसमधून बाद झाला. यासोबतच ज्या सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे त्यांच्या चेहऱ्यावर फोम लावायचं कार्यही बिग बॉसने सोपवलं होतं. ज्यामध्ये सई, मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्करने रेशमला नॉमिनेट करून ‘टिकीट टू फिनाले’मधून बाद केलं. अशा प्रकारे आस्ताद आणि रेशम या टास्कमधून काल (बुधवारी) बाद झाले.
Megha च्या तिखट शब्दांनी Pushkar ला आलं रडू. पाहा, #BiggBossMarathi सोम-शनि. रात्री 9.30 वा. फक्त #ColorsMarathi वर.
Follow करा #BiggBossMarathi चं Official Handle: @BiggBossMarathi@meghadhade @jogpushkar @SmitaGondkar @manjrekarmahesh #ReshamTipnis #SaiLokur #SharmishthaRaut pic.twitter.com/MembuMd8mk— Colors Marathi (@ColorsMarathi) July 12, 2018
बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहे. ज्यामध्ये स्मिताला रेशम आणि आस्ताद यांच्यातील संभाषण दाखविण्यात येणार आहे. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. कोण कोणाच्या पाठीशी काय बोलले यावरून सदस्यांमध्ये वाद होणार हे नक्की. त्यामुळे मेघा, सई आणि पुष्करच्या मैत्रीत पुन्हा फूट पडेल का हे आजच्या भागात स्पष्ट होईल.
Video : सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘या कारणांसाठी सूरमा सिनेमा पाहाच!’
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना येऊन आता जवळपास ९० दिवस पूर्ण होतील. या प्रवासामध्ये स्पर्धकांमध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज – गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांना बॉक्स – अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहे. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे हे आजच्या भागात पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.