‘बिग बॉस ओटीटी’ हा शो लोकप्रिय शो पैकी एक आहे. शोमध्ये असलेले स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. चाहत्यांना प्रत्येक स्पर्धक आवडतो. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापटे यांच्या जोडीने वेधले आहे. त्यांच्यातला रोमान्स हा नेटकऱ्यांना प्रचंड आवडतो. बऱ्याचवेळा राकेश आणि शमिता एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगताना दिसतात. आता शमिता राकेशला मुलांविषयी बोलत असल्याचे एका व्हिडीओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

शमिताचा हा व्हिडीओ तिच्या एका फॅनक्लबने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत शमिता राकेशला बोलते, ‘मी कधी कधी विचार करते की मला मुल पाहिजे. पण मग मला असं वाटतं की या वयात दोन मुल. मग तुम्ही असं दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करू शकत नाही. मी माझी बहिणी शिल्पाशिवाय राहू शकत नाही.’

आणखी वाचा : अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अशोक सराफ आता काय करतात?

आणखी वाचा : करिश्मा आणि करीनाच्या शाळेची फी भरण्यासाठी देखील पैसे नव्हते- रणधीर कपूर

राकेश आणि शमिता यांच्यात असलेलं प्रेम हे प्रेक्षकांना दिसते. राकेश जेव्हा दिव्याशी बोलतो तेव्हा शमिताला राग येतो. यावरून सगळे स्पर्धक राकेश आणि शमिताला चिडवताना दिसतात. तर दुसरीकडे राकेशला नॉमेनेशनपासून वाचवण्यासाठी शमिताने तिच्या कुटुंबाने दिलेले पत्र न वाचता फाडले आणि स्वत: नॉमिनेट झाली.

Story img Loader