बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धकांची रंगत आणायला सुरूवात केली आहे. घरात दाखल झालेले सर्व स्पर्धक घरात रुळू देखील लागले आहेत. त्यातच घरात रंगला तो या आठवड्याच्या मध्यात झालेलं जीशान खानचं एलिमिनेशन. या आठवड्याच्या वीकेन्डच्या वारकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. जितकी उत्सुकता बिग बॉस ओटीटीच्या घरात याबद्दल होती तितकीच ती घराबाहेर प्रेक्षकांमध्ये देखील होती. हा वार रंगला तर उत्तम पण अनेकांनी अंदाज लावल्याप्रमाणेच पार पडला.

बिग बॉस ओटीटीच्या या वीकेंड वारमध्ये होस्ट करण जोहरने सलमान खानसारखंच सस्पेन्स बनवला होता. या आठवड्याच्या एलिमिनेशनमध्ये कोण बाहेर पडणार या विचारात असतानाच करण जोहरने सर्व स्पर्धकांना आनंदाची बातमी दिली. या आठवड्यात कोणतंही एलिमिनेशन होणार नाही, हे कळल्यानंत सर्व स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का बसला. या आठवड्याच्या एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झालेले प्रतीक, मिलिंद, अक्षरा आणि नेहा यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता. पण पुढच्या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर होतील, हे सांगत करण जोहरने स्पर्धकांच्या आनंदात थोडं गांभिर्य भरलं.

या आठवड्याच्या मध्यात बिग बॉस ओटीटीमधून जीशान खान घराबाहेर झाला होता. प्रतीक सेहजपालसोबत झालेल्या भांडणानंतर बिग बॉसने त्याला चांगलंच फटकारलं देखील होतं. बिग बॉसच्या घरातील नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्याला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे बिग बॉस ओटीटीच्या घरात टेन्शन असलं तरी बाहेर अनेकांनी अंदाज लावला होता की यंदा एलिमिनेशन होणार नाही. अगदी तसंच झालं. आठवड्याच्या मध्यात झालेल्या या एलिमिनेशनमुळे बाकी इतर सदस्यांना मात्र याचा मोठा फायदा झाला. आठवड्यात आधीच एक स्पर्धक बाहेर गेला असल्याने या वीकेंडमध्ये कोणतंही एलिमिनेशन झालेलं नाही. एलिमिनेशनची टांगती तलवार करणने शेवटपर्यंत स्पर्धकांच्या डोक्यावर तर ठेवली पण नंतर जाहीर केलं की सगळे सेफ आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot Select (@vootselect)

यापेक्षा आणखी मोठं सरप्राईज बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांना मिळालं. लवकरच या शोमध्ये एक वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण करण जोहरने यावर आणखी सविस्तर माहिती देणं टाळलं आहे. तरीही घरात कोणत्या नव्या सदस्याची एन्ट्री होणार याची चर्चा मात्र जोरात सुरूय. त्यामुळे आता या नव्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीने बिग बॉस ओटीटीच्या घरात आणखी काय पहायला मिळणार, याची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली आहे.