बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज त्याच्या वाढदिवस साजरा करतोय. बॉलिवूडमध्येच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जादून आर माधवनने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. खास करून तरुणींमध्ये आर माधवनची मोठी क्रेझ होती. देशभरात आर माधवनेचे अनेक चाहते आहेत. मुळात लाजाळू स्वभाव असलेल्या आर माधवनची लव्ह स्टोरी खूपच खास आहे. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याची लव्हलाईफ जाणून घेणार आहोत.

१ जून १९७० ला झारखंडमधील जमशेदपूरमध्ये माधवनचा जन्म झाला. आर माधवन आभ्यासात तसा हुशार होता. त्याला आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. मात्र पालकांच्या इच्छेमुळे त्याने कोल्हापुरातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच आर माधवनने क्युम्यूनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंगचा क्लास घेण्यास सुरूवात केली होती. या वेळी आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांची पहिली भेट झाली होती.

सरितानेच विचारलं होतं डेटसाठी
याचवेळी सरिताने माधवच्या क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर सरिताला एअर हॉस्टेसची नोकरी मिळाली. माधवने आभार मानण्यासाठीच सरीताने त्याला डिनरसाठी विचारली. लाजाळू स्वभाव असलेल्या माधवनने मात्र ही संधी सोडली आहे. आर माधवनला त्याच्या सावळ्या रंगामुळे कायम लग्नाची चिंता होती. कुणी त्याच्याशई लग्न करेल की नाही असा प्रश्न त्याला सतावत होता. त्यामुळे सरिताने त्याला डेटसाठी विचारताच तो तयार झाला. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, “माझा रंग सावळा होता त्यामुळे मला वाटायचं माहित नाही कधी माझं लग्न होईल की नाही. सरिता माझी विद्यार्थीनी होती. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. मला तेव्हा वाटलं ही चांगली संधी आहे आणि मी लगेच डीनरचा प्रस्ताव मान्य केला. ”

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

पहिल्या डेटनंतर सरिता आणि माधवनमध्ये मैत्री वाढली नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. माधवन आणि सरिताने ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर १९९१ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. अशा प्रकारे माधवनने त्याच्या विद्यार्थीनीशीच लग्न केलं. सरिता आणि माधवनला एक मुलगा असून त्याचं नाव वेदांत आहे.

टीव्हीवरील जाहिराती, मालिका ते सिनेमा असा आर माधवनचा फिल्मी प्रवास देखील खूपच खास आहे.