काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेला बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जामीन अर्जावर आज सकाळी साडेदहा वाजता जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आज निर्णय न घेता उद्या सुनावणी होणार आहे. अर्धा तास वकिलाची बाजू ऐकल्यावर उद्या सकाळी न्यायालय १०.३० वाजता निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे सलमानचा आजचा मुक्कामही तुरूंगातच होणार आहे. सलमानला आज तुरुंग कैद्याचा गणवेश देण्यात येणार आहे. न्यायालयाने काल सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला.

या प्रकरणात हैदराबादच्या डीएनए फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट्सद्वारे काळवीटचे लाइल्ड लाइफ फॉरेंसिक टेस्ट करण्यात आले होते. काळवीट शिकार प्रकरणी सीडीएफडी म्हणजेच Centre for DNA fingerprinting and Diagnostics ने सलमानविरोधात अनेक पुरावे शोधून काढले. त्यांच्या या रिपोर्टमुळेच सलमान गजाआड जाऊ शकला.

सीडीएफडीचे माजी कर्मचारी जीव्ही राव यांनी सलमानविरोधातले अनेक पुरावे सादर केले. त्यांच्या या पुरांव्यांवरूनच सलमानविरोधात काळविट हत्या प्रकरणाचा निर्णय देण्यात आला. राव यांनी २०१५ च्या डिसेंबर महिन्यात न्यायालयासमोर या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे सादर केले. तेव्हा राव सीडीएफडीमध्ये डीएनए फइंगरप्रिन्ट लॅबचे चीफ स्टाफ साइंटेस्ट होते. १९९९ मध्ये काळवीट हत्या प्रकरणात त्यांच्या टीमने खास माहिती गोळा केली होती.

टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबर १९९८ मध्ये इनवेस्टिगेशन ऑफिसर आणि असिस्टंट कंसरवेटर ऑफ फॉरेस्ट ऑफ जोधपुर, ललित के. बोरा यांनी या प्रकरणाचा अतिशय सावधगिरीने पाठपुरावा केला होता. त्यांनी पुरलेल्या काळवीटला बाहेर काढून शोध सुरू ठेवला होता. त्यांनी काळवीटच्या चामडीचे आणि हाडांचे परीक्षण केले. त्यावेळी भारतात वाइल्ड लाइफ फॉरेंसिकची नुकतीच सुरूवात झाली होती. त्यामुळे सगळीच व्यवस्था नवीन असल्यामुळे सुरूवातीला अपेक्षीत असे काम झाले नाही. तरीही अथक मेहनतीने आणि तपासाने मेलेल्या हरणाच्या जातीचा शोध घेतला गेला.

राव म्हणाले की, ‘२०१५ मध्ये आम्ही हरणाची जात कशा पद्धतीने शोधून काढली याबद्दल पूर्ण माहिती न्यायालयाला दिली. फेरतपासणीदरम्यानही आम्हाला दुसऱ्यांदा स्वतःला सिद्ध करावं लागलं होतं. अखेर आमच्या मेहनतीला यश मिळालं आणि सलमान दोषी ठरला याचा मला आनंद आहे.’ राव हैदराबाद येथे राहत आहेत. ते अनेक पर्यावरणसंबंधी केसमध्ये त्यांचे सहकार्य करत आहे.