बॉलिवूड, ग्लॅमर या साऱ्यांमध्ये कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी चाहत्यांमध्ये बरंच कुतूहल पाहायला मिळतं. इतकेच नव्हे तर सेलिब्रिटींप्रमाणे अथवा त्यांच्या कुटुंबियांप्रमाणे आपल्यालाही राजेशाही थाटातील आयुष्य जगण्याची संधी मिळावी अशी अनेकांचीच अपेक्षा असते. सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत सेलिब्रिटी किड्सविषयी असे कुतूहल पाहायला मिळते. अशाच काही सेलिब्रिटी किड्समधली एक चिमुकली म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी मुलगी आराध्या.

आराध्या नेहमीच आपल्या पालकांसोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावते. तेव्हा तिच्याकडे अनेकांचेच लक्ष लागून राहिलेले असते. स्टार किड आणि एका महान अभिनेत्याची नात असलेल्या आराध्याच्या वागण्यातील लोभसपणा अनेकांच्याच मनाचा ठाव घेतो. आराध्या नेहमीच तिच्या कुटुंबियांसोबत विविध ठिकाणी जाते. तिला कधीच एकटे सोडले जात नाही. हीच बाब लक्षात घेत; आराध्या कधी शाळेत जाते की नाही? असा प्रश्न एका ट्विटर युजरने विचारला. अभिषेक बच्चनच्या ट्विटर हँडलचा उल्लेख करत त्या युजरने आराध्याविषयीचा हा प्रश्न विचारला. तुम्ही आराध्याला सर्वसामान्य मुलीप्रमाणे बालपण जगण्याचा अनुभव घेऊ देत नाही, असे म्हणत त्या युजरने आपला प्रश्न मांडला.

https://twitter.com/shirjahan/status/937624307827662848

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

त्या युजरच्या प्रश्नाचे अभिषेकने उपरोधिक शैलीत उत्तर दिले. माझ्या माहितीप्रमाणे आठवड्याच्या शेवटी शाळांना सुट्टी असते. इतर दिवशी ती शाळेत जाते, असे म्हणत त्या युजरच्या ट्विटमधील इंग्रजी व्याकरणाच्या चुकांकडे लक्ष वेधले. अभिषेकने आपल्याला उद्देशून केलेले ट्विट पाहून पुन्हा ती युजर पेचात पडली. ट्विटला रिप्लाय दिल्याबद्दल अभिषेकचे आभार मानत स्वत:च्या चुका हसण्यावरी नेल्या. त्यासोबतच सर्वसामान्य लहान मुलांप्रमाणे आराध्याचे शाळेत जातानाचे काही फोटोसुद्धा पोस्ट करत जा, कारण ती नेहमीच आपल्या आईसोबत दिसते असा सल्लादेखील द्यायला विसरली नाही. अभिषेत आणि त्या महिलेमध्ये झालेले ही ट्विटची देवाण-घेवाण सध्या बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, आता सेलिब्रिटींच्या मुलांवरही नेटकऱ्यांकडून निशाणा साधण्यात येत असल्याचे यातून दिसते.