‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधुन देखील शोक व्यक्त केला जातोय. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बिग बी अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्रासोबतच अभिनेता शाहरुख खान आणि अक्षय कुमारने देखईल एक ट्वीट करत मिल्खा सिंग यांच्या निधनाचं दु:ख व्य़क्त केलंय.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर शाहरुख खानने एक पोस्ट शेअर केलीय. यात तो म्हणाला, ” फ्लाईंग सिख कदाचित यापुढे आपल्यासोबत नसतील मात्र त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा अतुलनीय वारसा कायम आपल्यासोबत असेल. माझ्यासह लाखो लोकांसाठी प्रेरणा.” अशा आशयाची पोस्ट शाहरुखने केली आहे.

आणखी वाचा: “भारताचा अभिमान”; मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन आणि प्रियांका चोप्राने शोक व्यक्त केला

तर अभिनेता अक्षय कुमारने देखील एक पोस्ट शेअर केलीय, ” मिल्खा सिंग यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. त्यांची भूमिका न साकारल्याचं दु:ख मला कायम लक्षात राहिल. तुम्ही स्वर्गात सुवर्ण धाव घ्या.. ‘फ्लाईंग सिख’, ओम शांती.” अशी पोस्ट करत अक्षयने दु:ख व्यक्त केलं. तसचं ‘भाग मिल्खा भाग’ या सिनेमात मिल्खाही भूमिका न साकारल्याचा खेद वाटत असल्याचं तो म्हणालाय.

आणखी वाचा: ‘मी हे स्विकारायलाच तयार नाहीये’; मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक

शाहरुख आणि अक्षयसोबतच अनेक सेलिब्रिटींनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर (PGIMER) चंदीगडमध्ये दाखल केले गेले.