सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन हे तीन बंगल्यांचे मालक आहेत. ‘जलसा’, ‘प्रतिक्षा’ आणि या बंगल्यांचे मालक असणारे हे महानायक एकेकाळी भाड्याच्या घरात राहात होते यावर तुमचा विश्वास बसेल का? खरंतर यावर तुमचाही विश्वास बसणार नाही पण, हेच खरं आहे. सोशल मीडियावर नेहमीच काही फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बिग बींच्या भाड्याच्या घराचे असल्याचं लक्षात येत आहे. कारण, त्यांनी कॅप्शनमध्येच तसं म्हटलं आहे.
काही वर्षांनी आपल्या जुन्या घराला भेट दिल्यानंतर एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात ज्या भावना दाटून येतात अगदी त्याच प्रकारच्या भावना बिग बींच्या मनातही दाटून आल्याचं हे कॅप्शन वाचून लक्षात येत आहे. बच्चन यांनी पोस्ट केलेला हा फोटो त्याच्या अलाहाबाद येथील घराचा असून कधी काळी ते या घरात भाड्याने राहात होते. या प्रशस्त घरातील फक्त काही भागातच त्यांचा वावर होता.
महानायक अमिताभ बच्चन यांनी फक्त त्यांच्या घराचेच फोटो पोस्ट केले नाहीयेत. तर, अभिषेक बच्चनच्या बालपणीचेही काही फोटो त्यांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळत आहे. हे फोटो आणि त्यांचे कॅप्शन पाहता अमिताभ बच्चनही काही सुरेख आठवणींमध्ये रमल्याचं पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/BVOysNMhint/
आठवणींमध्ये रमलेले बिग बी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, बहुतांश चित्रीकरण परदेशात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटामध्ये परफेक्शनिस्ट आमिर खान, अभिनेत्री फातिमा सना शेख आणि कतरिना कैफही झळकणार आहेत.
पाहा : VIDEO: माझ्यासाठी अनुष्कासोबतचा ‘तो’ क्षण खूप खास- विराट कोहली