बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या झारखंड येथील दौलतगंजमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करतोय. यादरम्यान त्याने असे काही काम केले ज्यामुळे त्याच्यावर दंड भरण्याची वेळ आली.

Tiger Zinda Hai Review वाचा : टायगरचा ठसा!

अर्जुन आगामी ‘नास्तिक’च्या चित्रीकरणासाठी दौलतगंजला पोहचला आहे. तेथे तो रेल्वे स्टेशन परिसरात उघडपणे धुम्रपान करताना दिसला. त्यामुळे त्याच्यावर २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. सुत्रांच्या माहितीनुसार, त्याला केवळ दंड भरुन सोडण्यात आले नाही तर त्याला नोटीसही देण्यात आल्याचे कळते. खरंतर झालं असं की, अर्जुन धुम्रपान करत असतानाचे फोटो तेथील लोकांनी काढले. त्यानंतर एका व्यक्तीने त्यासंबंधीत तक्रार पोलिसांकडे दाखल करताच पलामू उपविभागीय अधिकारी एन के गुप्ता यांनी सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याकरिता अर्जुनला २०० रुपये दंड भरण्यास सांगितले.

वाचा : ‘फोर्ब्स’च्या यादीत सलमानच अग्रस्थानी

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्हा असल्याने अर्जुनवर कारवाई केली जावी असे तक्रारकर्त्याने म्हटले होते. चित्रीकरण पाहण्यासाठी हजारो युवक सेटवर येतात. त्यात एक अभिनेताच धुम्रपान करत असेल तर चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहचतो.