बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. अँन्टी नार्कोटिक्स सेल म्हणजे एएनसीने ही कारवाई केलीय. ड्रग्स संबंधित एका प्रकरणात चौकशी दरम्यान ध्रुवचं नाव समोर आलंय. मुंबई एनसीबीने याची माहिती दिलीय. गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटवर डोळा ठेवून आहे. यात अनेक सेलिब्रिटींची चौकशीदेखील करण्यात आलीय.

अँटी नार्कोटिक्स सेलचे आयुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून ध्रुव ताहिल याच्यावर ड्रग्सची खरेदी विक्री करण्याचे आरोप आहेत. चौकशी दरम्यान या आधी अटक करण्यात आलेला आरोपी मुजम्म‍िल अब्दुल रहमान शेख याच्याकडू 35 ग्रॅम मेफड्रोन जप्त करण्यात आलं होतं. एनडीपीएसच्या नियमानुसार या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा फोनही ताब्यात घेण्यात आला होता. यात ध्रुवने आरोपी मुजम्म‍िल अब्दुल रहमान शेख यांच्याशई ड्रग्स संबंधित चॅट केल्याचं समोर आलं आहे. एएनआय वृत्तानुसार बुधवारी मुंबई क्राईम ब्रान्चच्या अँटी नार्कोटिक्स सेलने ध्रुवला अटक केली.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
K Kavitha Arrested By CBI
के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

ध्रुव ताहिल 2019 पासून मार्च 2021 पर्यंत आरोपी मुजम्म‍िल अब्दुल रहमान शेखच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय. ध्रुवच्या व्हाटस्अॅप चॅटवरून त्याने आरोपीशी ड्रग्स घेण्यासाठी संपर्क केल्याचं कळतंय. तसचं ध्रुववर शेखच्या खात्यात सहा वेळा पैसै ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे.

अँटी नार्कोटिक्स सेलचे आयुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात एएनसीची टीम पुढील तपास करत आहे.
ध्रुव ताहिल सध्या अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्न करतोय.