रुपेरी पडदा आणि कलाकारांचे खरे आयुष्य यात बराच फरक असतो हे खरे. कारण, काल्पनिक कथांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारी ही कलाकार मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र बऱ्याचदा पूर्णपणे वेगळी असतात. अभिनेता जॉन अब्राहमचेच उदाहरण घ्या ना. विविध चित्रपटांमध्ये अनेकदा स्पोर्ट्स बाइक चालवणारा, खलनायकांशी लढताना दिसणाऱ्या जॉनची एक वेगळी बाजू नुकतीच पाहायला मिळाली. त्याची ही वेगळी बाजू म्हणजे अध्यात्माकडे असलेली त्याची ओढ. ‘डॅशिंग’ अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या जॉनचा अध्यात्माकडेही तितकाच कल असल्याचे त्याची इन्स्टाग्राम पोस्ट पाहून लक्षात येते.

जॉनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तो दलाई लामा यांच्यासोबत चर्चा करताना दिसतो आहे. दलाई लामा यांच्या सानिध्यात असल्यामुळे मी अध्यात्माच्या आणखीन जवळ गेलो असल्याचे त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर असणारे तेज, सकारात्मक उर्जा आणि एक वेगळीच अनुभूती असल्याचा अनुभव जॉनने शेअर केला. जॉनचा हा अनोखा अंदाज अनेकांसाठीच नवा होता.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या जॉन त्याच्या आगामी चित्रपटात व्यग्र असल्याचे कळते. त्यासोबतच तो आपल्या फिटनेसकडेही तितकेच लक्ष देतोय. येत्या काळात तो, ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटातून ‘कॉकटेल’ फेम अभिनेत्री डायना पेन्टीसुद्धा झळकणार आहे. १९९८ मध्ये पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचणीचा प्रसंग या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘क्रिअर्ज एन्टरटेन्मेन्ट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अभिनेता बोमन इराणीसुद्धा झळकणार असल्याचे समजते.