बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आणि बॉलिवूडचा ‘सुलतान’ सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघांना बॉलिवूडचे करण- अर्जुन म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हीच मैत्री निभावत शाहरूखने सलमानला अत्यंत महागडी भेटवस्तू दिली आहे. एक लक्झरी कार शाहरूखने सलमानला भेट म्हणून दिली आहे.

आता ही महागडी भेटवस्तू देण्याचे कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सलमानने आपल्या व्यस्त कामकाजातून शाहरूखसाठी वेळ दिला म्हणून ही लक्झरी कार त्याने भेट दिली. ‘ट्युबलाइट’ चित्रपटात शाहरूखने कॅमिओ करण्यास होकार दिल्यास आनंद राय यांच्या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या रुपात येण्याचे सलमानने मान्य केले होते. त्यानुसार शाहरूख ‘ट्युबलाइट’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसला. साहजिकच आपल्या ‘कमिटमेंट’साठी प्रसिद्ध असलेला सलमानही शाहरूखची भूमिका असलेल्या आगामी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

PHOTO : झोपाळ्याचा आनंद घेतोय गोंडस तैमूर

आपल्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत दिलेला शब्द पाळल्याचे शाहरूखला अप्रूप वाटले. त्यामुळेच अत्यंत महागडी अशी कार भेट देऊन शाहरूखने कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे ही कार नव्याने लाँच झाली असून अद्याप हे मॉडेल कोणाकडेच नाही.

वाचा : छोटा पडदा कधीच सोडणार नाही- मौनी रॉय

आनंद एल राय यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटात अनुष्का शर्मा, शाहरूख खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. याआधी ‘जब तक है जान’ चित्रपटात तिघांनी एकत्र भूमिका साकारली होती.

Story img Loader