मिलिंद सोमण सध्या त्याच्या कोणत्याही प्रोजेक्टमुळे नव्हे तर प्रेयसीसोबतच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आहे. ५२ वर्षांचा सुपरमॉडेल मिलिंद सोमण १८ वर्षांच्या अंकिता कोनवारला डेट करत असल्यामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे. अंकिता मिलिंदहून वयाने बरीच लहान असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनी टीकेची झोडही उठवली आहे. पण, आता तिच्याबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे.

एका एन्टरटेन्मेन्ट पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मिलिंदच्या प्रेयसीचे खरे नाव अंकिता नसून संकुस्मिता कोनवार आहे. तिचे वय २२ ते २३ दरम्यान असावे. सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा पाहता तिच्या वयाचा खुलासा केला गेल्याचे म्हटले जात आहे. संकुस्मिता २०१३ पासून एका एअरलाइनमध्ये ‘केबिन क्रू’ म्हणून काम करते आहे. सर्वसामान्यपणे कोणत्याही ठिकाणी काम करण्यासाठी १८ वर्षांची किमान वयोमर्यादा असते. त्यामुळे एकंदर या सर्व विषयांवर लक्ष दिल्यास मिलिंदच्या प्रेयसीच्या म्हणजेच अंकिताच्या वयाचा अंदाज लावता येतो आहे.

वाचा : अभिनयाव्यतिरिक्त बॉलिवूडकरांचे ‘हे’ आहेत ‘इन्कम सोर्स’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिलिंद सोमण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. लोकांच्या मतांची फारशी पर्वा न करता तो अनेकदा अंकितासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अंकिता आणि तो सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. प्रेमाला वयाची मर्यादा नसते, अशा मतावर ठाम असणाऱ्या मिलिंदने २००६ मध्ये फ्रेंच अभिनेत्री Mylene Jampanoi सोबत लग्न केले होते. पण, तिच्यासोबतचे नाते तो फार काळ टिकवू शकला नाही. तीन वर्षाच्या संसारानंतर त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मिलिंद कलाविश्वात सक्रिय आहेच. पण, त्यासोबतच त्याच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये कुतूहल पाहायला मिळत आहे.